नवीन लेखन...

शीतपेयांचे दुष्परिणाम

आजची तरुण पिढी व लहान मुले पाण्याऐवजी कारबोनेटेड शीतपेय आवडीने पिताना दिसतात. अशा पेयात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर इतर अनेक द्रव्ये असतात. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रक्रियेसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही पाण्याची गरज इतर कोणतेही पेय भरून काढू शकत नाही. आपले शरीर पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही.

म्हणून उष्मांक विरहित स्वच्छ जीवनदायी पाण्याचा शरीराला सतत पुरवठा करणे आपले कर्तव्य आहे. कारबोनेटेड शीतपेये पाण्याऐवजी योग्य नाही. शरीरावर कारबोनेटेड शीतपेयांचे दुष्परिणाम होतात. १) बऱ्याच कारबोनेटेड पेयांमध्ये ‘कॅफेन’ हे उत्तेजक द्रव्य असते.
त्याचा दुष्परिणाम म्हणजे त्याची सवय लागते किंवा (कॅफेन असलेल्या पदार्थांचे) एक प्रकारचे व्यसनच लागते. कॅफेनमुळे शरीरातील पाणी (नेहमीपेक्षा जास्त) लघवीवाटे बाहेर फेकले जाते.
त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही पेये प्यायल्यामुळे पुरेसे पाणी आपण पीत नाही. परिणामतः डोकेदुखी थकवा, चिडचीड असे प्रकार होतात. कारबोनेटेड पेय केवळ तात्पुरती तहान भागवतात; परंतु आपली पाण्याची गरज या पेयामुळे वाढते. लहान मुलांमध्ये अशी पेये जास्त पिणाऱ्यांमध्ये वागणुकीत दोष, मनाची एकाग्रता न होणे, गरजेपेक्षा जास्त हालचाल, झोप न येणे, अशा समस्या आढळतात. पेशींमधील पाण्याची पातळी कमी झाल्यास शरीराची रोग प्रतिकार शक्ती ढासळते, अन्नपचन व्यवस्थित होत नाही. २) या पेयांमध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते. काही पेयांमध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरले जाते. या स्वरूपात असलेली साखर लहान मुलांमधील व मोठ्यांमधील स्थुलता वाढविते. या साखरेवर शरीरात फारच लवकर प्रक्रिया होते. त्यामुळे ‘ट्रायग्लिसराइड’ व ‘कोलेस्ट्रल’चे प्रमाण वाढू शकते. कारबोनेटेड पेय जास्त प्रमाणात पिणे म्हणजे हृदयरोग व मधुमेहाला आमंत्रणच आहे. ३) कारबोनेशन व फॉस्फॉरिक अॅसीडचे दुष्परिणाम विज्ञानं जनहितार यामुळे अशी पेये खूपच अॅसिडीक होतात. आपल्या शरीरातील आम्लता साधारण ७ असते तर या पेयांमधील आम्लता साधारण २.५ ते ३ पर्यंत असते. शरीरातील ही आम्लता कमी परिषद करण्यासाठी आपले शरीर खनिजांचा वापर करते. विशेषतः कॅल्शियम हाडांमधून घेतले जाते व त्यामुळेच अशी पेय पिणाऱ्यांच्या हाडांची घनता कमी होते. लहान मुले व तरुणांमध्ये ही पेय जास्त प्रचलित आहेत. या वयात हाडे कमजोर झाल्यास त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. हाडं कमकुवत व ठिसूळ होतात.

-डॉ. गीतांजली चितळे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..