आपला, आपल्या शहराचा व देशाचाही इतिहास आपल्याला माहित हवा..जे आपला भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य क्षमा करत नाही हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलंय..
मी मुंबईत जन्मलो, वाढलो व त्यामुळे मला सहाजीकच मुंबईच्या इतिहासात रस आहे आणि तो निर्माण करण्याचं काम केलं मुंबईच्या फोर्ट परिसराने..
मुंबईचा फोर्ट परिसर आपल्यावर गारूड करतोच..मग त्या इतिहासाचा मागोवा घेत गेलं की अनेक रोमहर्षक गोष्टी वाचायला मिळतात..अनेकांनी यावर अफाट काम करून ठेवलंय..थोडं कुतुहल, थाडी उत्सुकता आणि थोडीशी मेहेनत केली असता खुप काही वाचायला मिळू शकतं..इंटरनेटमुळं तर हे खुपच सोप्प झालंय..असाच एकदा वाचनात मुंबईच्या ‘फोर्ट’चा त्रोटक इतिहास आला आणि मी त्या ठिराणाला प्रत्यक्ष भेट दिली;आणि त्यातून जी काही मनोरंजक माहिती हाती लागली ती मी “मुंबईचा ‘फोर्ट..” या लेखातून आपल्याशी शेअर केली..
माझ्या त्या लेखामुळे अनेकांनी तिथं भेट दिल्याचं सांगितलं तर अनेक जणांनी तिथं जाणार असल्याचं सांगीतलं..त्या लेखाचा हेतू, आपल्या सर्वांचं आपल्या इतिहासाबद्दल आपलं कुतूहल जागृत करणं हाच होता व तो बऱ्यापैकी साधला असं म्हणायला हरकत नाही..
‘मुंबईचा फोर्ट’ या लेखाच्या पुढील भागात मी मुंबईत अद्यापही शिल्लक असलेल्या व थोऽडा प्रयत्न केल्या सहज पाहता येतील अशा पाऊल खुणांची माहीती फोटोसहीत देणार आहे..पुढचा लेख ‘मुंबईतील रस्त्यावरचे ब्रिटीशकालीन माईलस्टोन- वय वर्षे १८०-३००’ हा असणार आहे..
भेटू लवकरच.
–गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply