नवीन लेखन...

सिकंदरची शांतता

दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी

जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी

आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती

लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती

पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे

मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे

सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी

जगत् जेता नांव कमवूनी,  जाईन माझ्या देश दरबारी,

काय करशील नंतर तू गे?   प्रश्न विचारी तो साधू जन

“शांत राहण्या प्रयत्न करित,  अखेरचा मी काळ घालविन”

मिस्कीलतेने साधू विचारी,  मी तर आजच शांत आहे

धडपड सारी करूनी एवढी,  माझ्याच मार्गे तुम्ही जाए

ध्येय विसरूनी सारे आपण,  धावत असतो वेड्या परी

प्रभू मिलनाचे कार्य खरे,  ते मनास जागविते केंव्हां तरी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..