एकदा एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले-
“ते सनातन, अनंत परब्रह्म, ते उपनिषदांनी वर्णिलेलं ईश्वर रूप कुठे आहे?”
गुरु काही बोलले नाहीत. शिष्याने पुनः पुन्हा विचारणा केली पण गुरूंनी तोंड उघडले नाही. ते अगदी शांत राहिले.
शेवटी ते म्हणाले-
” मी तुला सांगत आलोय, पण तू ते समजून घेत नाहीस, मी तरी काय करू? ते अनंत, सनातन तत्त्व फक्त प्रगाढ शांततेतूनच स्पष्ट करता येईल. शाश्वत शांततेतच त्या परमतत्वाचा निवास आहे. अयं आत्मा शांतः !
मन शुद्ध करून ध्यान कर. सर्व वृत्ती कह्यात ठेव. शांततेत बुडून जा. शांतता जाणून घे. महामौनी हो. मग तू जीवन्मुक्त होशील. ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply