सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला ‘टार्जन गोज टू इंडिया’ या सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा सिमीने स्वीकारला होता. आपल्या पहिल्या सिनेमात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले.
सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. सिमी गरेवाल या ‘दो बंधन’, ‘साथी’, ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘सिद्धार्थ’ या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जातात. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिद्धार्थ’ या सिनेमात सिमी गरेवालने बॉलिवूडमधला पहिला न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा सिनेमा सर्वाधिक वादग्रस्त सिनेमा ठरला होता. कोनरॉट रुक्सच्या ‘सिद्धार्थ’ या सिनेमात अनेक हॉट आणि वादग्रस्त सीन्स होते. एका सीनमध्ये तर शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालच्या समोर उभे दिसतात. हे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या न्यूड सीनमुळे ‘सिद्धार्थ’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. सिमी गरेवालने “रुखसत ” या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती व अनुराधा पटेल यांच्या भूमिका होत्या. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman’s World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. सिमी गरेवाल यांची खासियत म्हणजे त्या नेहमी पांढ-या रंगाचे कपडेच परिधान करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply