नवीन लेखन...

राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात लहान मोठ्या प्रमाणात ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागतो तेंव्हा काही अडचणी येतात आणि जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.
Image result for angry
अशा परिस्थितीतला तोंड द्यायचे तर काय करायचं? तज्ज्ञांच्या मते, कुठलीही व्यक्ती जेव्हा रागावते तेव्हा तिच्या शरीरात एक एनर्जी तयार होते आणि जर ती दाबून ठेवली, तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळी काय करावं? तज्ज्ञ नेहमी सांगतात, की तुम्ही अनेक सिनेमे आठवा त्यात राग आला तर हिरो पंचिंग बॅगवर आपला राग काढतो. तुम्हीही तसंच करू शकता ते पण तुमच्या घरातील उशीवर आणि जर बाहेर कुठे असाल तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, दीर्घ श्वास घ्या आणि तोंडावाटे सोडा किंवा १०० ते १ असे उलटे आकडे मोजा. त्यामुळे तुमच्या रागाला वाट मिळेल आणि वातावरणही कलुषित होणार नाही.
राग आला तर वर मी म्हटल्याप्रमाणे तो व्यक्त होण्याआधी दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वसनानं राग शांत होण्यास मदत होते. अनेकदा लोक रागाची घटना घडून गेल्यावर तेच तेच उगाळत बसतात आणि कित्येक दिवस ते मनात ठेवून घेतात तर तसं अजिबात करू नये बऱ्याचदा घटना या प्रासंगिक असतात. संवादानं बऱ्याच समस्या कमी होतात.याशिवाय रोज अर्धा तास मेडिटेशन केलं तर मन शांत राहतं. आलेला राग चटकन नाहीसा होतो. रोज रात्री झोपण्या अगोदर टीव्ही अथवा मोबाईल मध्ये वेळ घालवण्यापेक्षा शांत बसून स्वसंवाद करा.
— संकेत प्रसादे
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..