प्रियांका बर्वे यांचा जन्म १० एप्रिल १९९० रोजी पुणे येथे झाला.
प्रियांका बर्वे, खरी Versatile गायिका.
चित्रपट, व मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या प्रियांका बर्वेने ‘मुघल-ए-आझम : द म्युझिकल’ या भव्यदिव्य संगीत नाटकात काम करून केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूड जनांच्या मनातही स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
प्रियांका बर्वेची आजी मालती पांडे-बर्वे या ज्येष्ठ गायिका होत्या आणि आजोबा पद्माकर बर्वे शास्त्रीय गायक होते, गायक राजीव बर्वे आणि कवयित्री संगीता बर्वे यांची कन्या असलेली प्रियांका बर्वे ही आजीची गाणी आणि आजोबा घेत असलेले शास्त्रीय संगीताचे क्लासेस यामुळे गाणं ऐकत-ऐकतच ती मोठी झाले. आजी त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षांपासून पार्श्वगायन करत होत्या. त्या मुळे पाचवीत असल्यापासून माधुरी जोशी यांच्याकडे प्रियांका बर्वेने शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. प्रियांका बर्वेचे महाविद्यालयीन फर्गुसन कॉलेज मध्ये शिक्षण झाले आहे.
शाळेत असताना प्रियांका बर्वे सगळ्याच गोष्टीत भाग घ्यायची. नाटकामुळे अभिव्यक्तीसाठी आणि नृत्याने तालाला मदत होईल, असा विचार करून घरच्यांनीही तिला कधी थांबवलं नाही.
शाळेत असताना किरण यज्ञोपवीत यांच्या ‘मळभ’ या नाटकात तिने काम केलं. प्रियांका बर्वेने २००९ मध्ये मराठी ‘सा रे ग म प’ मध्ये भाग घेतला होता. जेव्हा राहुल देशपांडे यांनी दर वर्षी एक संगीत नाटक पुनरुज्जीवित करायचं ठरवलं होतं. त्यातील ‘संगीत संशयकल्लोळ’ व ‘संगीत मानापमान’ व संगीत मध्ये प्रियांका बर्वेने काम केले होते. यूएसमध्ये बृहन्महाराष्ट्र मराठी संघात ‘संगीत मानापमान’चा प्रयोग केला होता, त्याला जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षकवर्ग होता.
प्रियांका बर्वेने ‘रमा माधव’, ‘मुंबई पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’,पानीपत या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. काही मालिकांची शीर्षकगीतं तिने गायली आहेत. ‘सागरिका म्युझिक कंपनी’ची तीन-चार गाणीही रेकॉर्ड केली आहेत. राहुल देशपांडे सोबत प्रियांका बर्वेने ‘शादाब’ हा गजलचा अल्बम रेकॉर्ड केला आहे. प्रियांका बर्वेने आपल्या पती सारंग कुलकर्णी सोबत ‘प्रियारंग प्रोजेक्ट’ या नावाने एक यूटय़ूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यावर प्रकाशित केलेल्या ‘महागणपतीम्’ या पहिल्या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
तौफिक कुरेशी यांच्यासोबत प्रियांका बर्वेच्या आजोबांची एक बंदिश यूटय़ूब चॅनेलवर आहे. फिरोझखान यांच्या मुघल-ए- आझम : द म्युझिकल’ या नाट्यकृतीत सादर केलेल्या अनारकलीत तिने काम केले आहे.
झी युवावरील संगीत ‘सम्राटपर्व २’ची सूत्रसंचालक म्हणून प्रियांका बर्वे काम केले आहे. प्रियांका बर्वेच्या सासरीही सगळे संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. प्रियांका बर्वेचे पती सारंग कुलकर्णी सरोदवादक आहे, व सासरे पं. राजन कुलकर्णी हे सुद्धा सरोदवादक आहेत. त्या दोघांनी सवाई गंधर्व महोत्सवात सरोदवादन सादर केले आहे.
प्रियांका बर्वेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply