नवीन लेखन...

गायिका अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांचा जन्म ९ एप्रिल १९७९ रोजी झाला.

अमृता फडणवीस यांचे वडील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे, तर आई चारू रानडे प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आहेत. अमृता फडणवीस यांचे शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं आहे, आई, वडील डॉ. असून त्यांना लहानपणापासूनच अर्थशास्त्र अन् संगीत आवडायचे. त्यामुळे त्यातच करिअर करायचे ठरवले. त्या वित्त विषयातील MBA आहेत.

माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अमृता फडणवीस यांचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत प्रेमविवाह झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या प्रचारकार्यात भाग घेतला होता. भाजपच्या विचारधारेचा प्रचारही त्यांनी केला आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते. अमृता फडणवीस या स्वत:ची ओळख ही केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून नाही तर ॲ‍क्सिस बँकेच्या अधिकारी म्हणून जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.आजही अमृता फडणवीस आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावत असतात.

अमृता फडणवीस ह्यांच्याबाबत लोकांना आवडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आजवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोला डोक्यावर पदर वगैरे घेऊन आणि पंढरपूरला पूजा वगैरे करतांना पाहिले होते. त्यांचे शिक्षण काय होते, त्या नोकरी करत का, किवा त्यांची ओळख जगासमोर आली नव्हती. (म्हणजे त्या मोठ्या नव्हत्या असे नाही) त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या कोणी आहेत वगैरे काहीही कोणाला कधीही कळले नव्हते. अमृता फडणवीस यांनी ती इमेज खोडून काढली. सेल्फ मेड व्यक्तिमत्त्व. ॲक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट हुद्द्यावर काम करत आहेत. गायन संगीत, नृत्य, खेळ अशा अनेक कला वेगवेगळ्या स्तरांवर येत असलेल्या अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी न्युयॉर्क फॅशन विकमध्ये कॅटवॉक करत खादी ग्रामोद्योगाचा प्रचार आणि स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्याचा मेसेज दिला होता.

प्रियांका गांधी राजकारणात आल्या, तेव्हा त्यांनी त्यांचे स्वागतच केले होते. अमृता या चांगल्या गायिकाही आहेत. प्रियंका चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘जय गंगाजल’ चित्रपटात त्यांनी भजन गायले आहे. या चित्रपटात अनेक ठिकाणी बॅकग्राऊंड साँगच्या रुपात त्यांचे भजन वापरण्यात आले आहे. गेल्या वर्षी महिला दिनाचं औचित्य साधून त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झाले होते. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सर्वात मोठे आदर्श आहेत. अमृता फडणवीस यांच्या वेगवेगळ्या गाण्यांवर चाहते उस्फुर्तपणे प्रतिक्रिया देत असतात. गणेशोत्सवाच्या काळात देखील अमृता फडणवीस यांचे गणपतीवरील, गाणे रिलीज झाले होते. या वर्षी महाशिवरात्री पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे आले आहे. त्यांनी स्वत:च्या आवाजातील हे गाण प्रदर्शित केले आहे. शिव तांडव असे गाण्याचे नाव आहे.गेल्या काही दिवसांपासून चाहते अमृता यांच्या नव्या गाण्याची आतुरतेने वाट बघत होते. आता या नव्या गाण्यानं अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडवणीस आणि अमृता फडवणीस नागपूरमध्ये कँसर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. संघ परिवाराची संस्था असलेल्या डॉ. आबाजी थत्ते या संस्थेच्या माध्यमातून वर्धा मार्गावर जामठा येथे ही योजना सत्यात उतरवण्याचा त्यांचा विचार आहे.

अमृता फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..