नवीन लेखन...

गायक आनंद शिंदे

जन्म. २१ एप्रिल १९६५

दमदार गायकी, ठसकेदार आवाजाने आनंद शिंदे यांचा एक वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला. ८० च्या दशकात धुमाकूळ घालणारे गाणे ‘जवा नवीन पोपट’ हा ऐकले की सर्वप्रथम डोळ्यापुढे चेहरा येतो आनंद शिंदे यांचा. आनंद शिंदे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. पण त्यांचे लहानपण मुंबईत गेले. कव्वालीचे मुकाबले हे त्यांच्या खास आवडीचे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला आनंद जात असत. कोरसमध्ये गाणी गाणे त्यांच्या अगदी आवडीचे होते. आनंद शिंदे यांचा जन्म संगीतप्रेमी घरात झाला. आनंद शिंदे यांनी शाळेत असतानाच गाणे म्हणायला सुरुवात केली. शाळेत अभ्यासापेक्षा गॅदरींगमध्ये गाणे गायला कधी मिळणार याकडे आनंद शिंदे यांचे लक्ष असे. नववीत नापास झाल्यानंतर आनंद यांनी हाती तबला घेतला. मार खात खात ते तबलावादन शिकले. जेव्हा कव्वालीचा मुकाबला असे तेव्हा आनंद आणि मिलिंद हे दोघे भाऊ ढोल वाजवायचे. वडिलांच्या गैरहजरीत तेच कार्यक्रम करत असत. आनंद शिंदे यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी, उर्दू, तामिळ आणि इतर अशा एकूण आठ भाषांमध्येही गायन केले आहे. होऊ दे जरासा उशीर हे टायटल गाणे असलेल्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले होते.

आनंद शिंदे यांना जनमाणसात लोकप्रिय करणारे गाणे ठरले ‘जवा नवीन पोपट’. या गाणे कसे बनले याची कथाही रंजक आहे. मुरबाड येथे एक कव्वालीचा कार्यक्रम होता. त्यात मानवील गायकवाड हे शिंदे यांच्या पार्टीचे कवी होते. या कार्यक्रमादरम्यान समोरच्या पार्टीने पोपटाचे एक गाणे म्हटले आणि त्याला पोपटाच्या गाण्यानेच उत्तर द्यायचे होते. तेव्हा प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यावर गायकवाड यांनी पोपटाचे गाणे रचले आणि नवीन पोपटाते गाणे तयार झाले. हे गाणे नंतर इतके प्रसिद्ध झाले की त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या गाण्याने त्यावेळी कॅसेट विक्रीचे सर्वच उच्चांक मोडले. हे पाहून व्हिनस कंपनीने त्यांना एक गाडी भेट दिली. ती आजही त्यांनी प्रेमाने जपून ठेवली आहे.

हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आनंद शिंदे यांना आहेत. आनंद शिंदे यांच्या तीन मुलांपैकी आदर्श शिंदे सध्या तरुणाईला आपल्या तालावर डोलायला लावत आहे. एकापेक्षा एक सुपरहिट गाणे सध्या आदर्शच्या नावावर आहेत. समाजाचे ऋण परतफेड करण्यासाठी त्यांनी उत्कर्ष या मुलाला डॉक्टर बनविले. पण तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्या नावावर त्यांनी ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली आणि या माध्यमातून ते गरीब रुग्णांची मोफत सेवा करत आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..