गायिका मंजुश्री ओक यांचा जन्म ५ जुलैला झाला.
मंजुश्री ओक यांचे शिक्षण एसएनडीटी येथे झाले असून त्यांनी संगीतात एम.ए. केले आहे. त्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची शिष्या आहेत.मंजुश्री ओक या श्री यशलक्ष्मी आर्ट च्या संस्थापिका आहेत. संगीत क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या अशा पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता. पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, अभंग, देशभक्तिपर गीते, भावगीते, लावणी अशा विविध प्रकारांतील गीतांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गीते वाद्यवृंदाच्या साथीने गायली गेली.जो गिनीज वर्ल्ड रकॉर्ड साठी हा प्रयत्न केला होता.२०१७ मध्ये सलग १२ तास त्यांनी आशा भोसले यांची १२१ गाणी गायली होती. मंजुश्री ओक यांनी यापूर्वी २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये दोन वेगळे विक्रम नोंदविले आहेत. २०१८ मध्ये मंजुश्री ओक यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपले गुरु पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली – संगीत दिलेली १५१ गाणी गाऊन आगळी वेगळी गुरुवंदना अर्पण केली होती. मंजुश्री ओक यांनी या नविन संकल्पनेद्वारे परत एकदा एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये आपल्या नावाची नोंद करण्याचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडला होता. दोन वेळा इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड व एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में कीर्तिमान स्थापित करणाऱ्या त्या एकमात्र भारतीय महिला आहेत.मंजुश्री ओक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Leave a Reply