मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव जयश्रीबाई असे होते. मोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . परंतु हरिदासबुवा एका गावात फार दिवस राहत नाही त्यामुळे त्यांच्या आई जयश्रीबाई हताश झाल्या. मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या. त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी १९१३ साली त्यांनी चंद्रेश्र्वर भूतनाथ नाटक कंपनीत गेल्या खऱ्या परंतु हा पण योगायोग विचित्र होता कारण १९१४ साली मातोश्री जयश्रीबाई यांचे निधन झाले. मोगूबाईच्या आईची जयश्रीबाईंची एकाच इच्छा होती की ती मोठी गायिका होईल तेव्हा त्यांचे आयुष्य पावन होईल ही इच्छा त्यांनी शेवटच्या श्वासाआधी बाळकृष्ण पर्वतकराना बोलावून त्यांनी प्रगट केली होती.
१९१७ साली मोगुबाई सातारकर स्त्री नाटक कंपनीत गेल्या तिथे चिंतुबुवा गुरव यांनी त्यांना गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्याच वेळी रामलाल यांच्याकडून त्यांनी दक्षिणात्य कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यासही सुरूवात केली होती. नर्तनातील मोहक पदन्यास भावपूर्ण मुद्रा लय आणि अभिनय हे पुढे त्यांच्या स्वरांना सखोल समज , परिणाम देण्यास उपयोगी पडले. चिंतुबुवाना मोगूबाईंच्यात गाणं शिकण्यासाठी कितीतरी ओढ आणि तत्परता आहे असे वाटले. पुढे त्यांनी त्या काळात सौभद्रानाटकात ‘ सुभद्रा ’ पुण्यप्रभाव नाटकात ‘ किंकिणी , ’ शारदा ‘ या नाटकात ‘ शारदा ’ मृच्छकटिकमध्ये ‘ वसंतसेना’ अशा विविध आव्हानात्मक भूमिका केल्या .याच काळात त्या दत्तारामजी नांदोकर यांच्याकडे गझल शिकल्या. ठुमरी , दादरा , कजरी , टप्पा , होरी हे संगीत त्यांनी प्रकार आत्मसात केले.
१९१९ साली मोगूबाई खूप खचल्या होत्या कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे दैव आड येत होतं. आजारामुळे त्यांचे शरीर कमजोर झाले होते. त्यांच्या मावशीने त्यांना प्रकृती स्वास्थासाठी सांगली येथे नेले . सांगलीला जाणे त्यांच्या संगीताच्याबाबतीत अत्यंत महत्वाचे ठरले. त्याच वर्षी खाँ इनायत पठाण यांच्याकडे त्यांनी एक वर्ष संगीत शिक्षण घेतले. सांगलीतील राजवैद्य आबासाहेब सांबारे यांच्याकडे प्रकृतीच्या उपचारासाठी आल्या आणि त्यांना एक नवीन दालनच उघडून मिळाले. राजवैद्यांच्या दिवणखाान्यात दर शुक्रवारी संगीताची मैफल भरत असे. त्यात पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं.पलुस्कर , खाँसाहेब अबदुल करीम खॉं , भूगंधर्व रहिमत खॉं , गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे , खाँसाहेब अल्लादिया खाँ. यांचे गाणे ऐकायला मिळाले.
१९२० साली मोगूबाईंना स्वतःहून शिकण्यासाठी त्यांचे रियाजाचे बोल ऐकून संगीतसम्राट खाँसाहेब अल्लादियाँखाँ यांनी स्वतःहून होऊन त्यांचा शिष्या म्हणून स्वीकार केला. ही तालीम वर्षभर चालली . कारण खाँसाहेब इनायत पठाण यांनी त्यांची शिकवणी अचानक थांबवली होती.
१९२२ साली राजर्षी शाहू छत्रपती गेले. त्यातच खाँसाहेबांचे उताराला आलेल वय आणि त्यातच राजाश्रय संपला होता म्हणून त्यांना नाइलाजाने आता सांगलीतून मुंबईला मुक्काम हलवावा लागला त्यामुळे मोगूबाईंच्या गाणे शिकण्यात पुन्हा व्यत्यय आला म्ह्णून त्या पण त्या परत गोव्याला गेल्या. परंतु १९२२ साली मोगूबाई रमामावशी बरोबर मुंबईत खेतवाडीत आल्या. खाँ. अल्लादियाँ खाँ यांची पुन्हा तालीम जवळ जवळ दीड वर्षे त्यांना लाभली. याच सुमारास लयभास्कर खाप्रुमामा यांची त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचा सहवास लाभला.
१९२३ साली श्री.माधवराव भाटियांशी विवाह झाला. १९३१ साली मोगूबाईंना मुलगी झाली. तिचे नांव किशोरी ठेवले.
मोगूबाईंच्या शेजारी खाप्रूमामा पर्वतकर राहायला आले. त्यांना ‘ लयभास्कर ’ ही पदवी होती. त्यांच्या उपस्थीतीत एकदा एच . एम .व्ही . मधील रखडलेल साडेपंधरा मात्रेतील योगतालतील यमन रागातील तराण्याची ध्वनिमुद्रिका पाच मिनिटांत रेकॉर्ड झाली , जी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत झाली नव्हती.
१९३४ साली संगीत सम्राट अल्लादियाखाँ यांचा गंडा बांधला. त्यासाठी त्यांनी १२५ तोळे सोने विकून गुरूदक्षिणा दिली. त्या काळात गंडाबंद शागिर्द असणे नसणे यात औरस आणि अनौरस संतती इतका फरक होता .
१९३५ साली त्यांची दुसरी मुलगी ललिता हिचा जन्म झाला. तर १९३८ साली त्यांचा मुलगा उल्हास उर्फ बाबू याचा जन्म झाला. १९३९साली श्री.माधवराव भाटिया यांचे निधन झाले. पुढे १९४० पासून मैफलींचे दौरे , रेडिओवरून गायन , संगीताच्या तालमी सुरू झाल्या.
अल्लादियाँ खाँसाहेब १८९२ साली महाराष्ट्रात आले आणि लोकांच्या गळयातील ताईत झाले. जाणकारांनी त्यांना बरीच बीरूद विशेषणं लावली. उत्तुंग अशा पदव्या बहाल केल्या. अल्लादियाँ खाँसाहेब १३ मार्च १९४६साली मुंबईत पैगंबरवासी झाले.
त्यानंतर मोगूईंनी त्यांच्या मुलीला किशोरीला गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यानी बऱ्याच गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवले. १९६५ साली त्यांनी कुर्डीगावातल्या रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार केला ज्यामुळे मोगूबाईंनी त्यांच्या आजीला दिलेला शब्द त्यांनी पुरा केला.
१९६८साली मोगूबाई यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘ संगीत नाटक अॅकेडमीचे अॅवॉर्ड ‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १९६९ मध्ये त्यांचा आकाशवाणी तर्फे सत्कार झाला. केंद्र सरकारने २६ जानेवारी १९७४ साली मोगूबाईंना ‘ पद्मभूषण ’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला . अनेक संगीत संस्थानी त्यांचे सन्मान केले. ‘ गानतपस्विनी ’ त्यांचा म्हणून सन्मान केला गेला . त्यांना असे अनेक पुरस्कार मिळाले.
मला आठवतंय दादरला ‘ वनिता समाज ‘ मध्ये किशोरीताई आमोणकर आणि आणि उस्ताद झाकीर हुसेन ह्या दोघांचा कार्यक्रम होता , दोघेही प्रथमच एकत्र आले होते त्यावेळी मोगूबाई तेथे जरा लांबवर बसल्या होत्या . सर्व काही त्या बघत होत्या . त्यांना पाहिल्यावर एक गोष्ट जाणवली की त्यांच्या नजरेत विलक्षण दरारा आणि , धाकही दिसत होता. प्रत्येकजण तेथे जपून वावरत होता.
जयपूर अत्रौली घराण्याच्या ‘ गानतपस्विनी ‘ मोगूबाई कुर्डीकर यांचे १० फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले .
— सतीश चाफेकर.
Leave a Reply