गायिका पद्मा वाडकर यांचा जन्म १९ जून १९७२ रोजी झाला.
पद्मा वाडकर या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांनीही अनेक गाणी गायली आहे. दहा वर्षाच्या असताना पद्मा या आचार्य जियालाल वसंत (सुरेशजी यांचे गुरु) यांच्या कडे गाणे शिकत होत्या. १९८५ मध्ये गुरुजींचे निधन झाल्यावर त्या सुरेशजींच्या संपर्कात आल्या. रूपारेल कॉलेज शिकत असताना कॉलेजला दांडी मारून त्या सुरेशजींच्या रियाझाला जात असत. त्या काळात त्या दोघांचे प्रेम जमले व सुरेश वाडकर यांनी १९८८ मध्ये पद्मजा वाडकर यांच्यासोबत लग्न केले.
या वाडकर दाम्प्त्याला दोन मुली असून जिया आणि अनन्या अशी त्यांची नावे आहेत.
पद्मा वाडकर यांचा ‘मोरे पिया’ अल्बम प्रसिद्ध आहे. यामध्ये सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांचा सहभाग आहे.
झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’या प्रसिद्ध गायन रिॲलिटी स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे.
त्या एक संगीत शिक्षिका असून आणि सुरेश वाडकर यांच्या अकादमीची सर्व धुरा सांभाळ आहेत त्या या अकादमीच्या उपप्राचार्य आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply