सावनी शेंडेला स्वरांचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचा जन्म १८ ऑगस्ट १९७९ रोजी झाला.आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या रूपाने गाण्याची शाळाच सावनीच्या घरी होती. कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या गायिका; तसेच संगीत नाटकाच्या पिढीतील उत्तम कलाकार होत्या.
वडील डॉ. संजीव शेंडे यांनाही शोभा गुर्टू यांचे मार्गदर्शन लाभले. दादरा, ठुमरी अशा उपशास्त्रीय गायनात त्यांचा हातखंडा आहे. लहानपणी आजीचा आणि वडिलांचा रियाज कानावर पडल्याने हळूहळू तिचा कान गाण्यासाठी तयार होऊ लागला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणीच सावनीची क्षमता उमगल्यामुळे तिचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. त्यानंतर बाराव्या वर्षी तिला राष्ट्रपतींसमोर गाण्याची संधी मिळाली.
सावनीने आजीकडून किराणा घराण्याचे, तर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, बंगळुरू यांसह देशभरात विविध ठिकाणी तिचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. सावनीने “कैरी’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्व गायन केले आहे. “सावली’ चित्रपटासाठी सावनी यांना पुरस्कारदेखील मिळाला आहे. पं. जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा मेमोरिअल पुरस्कार अशा पुरस्कारांच्या सावनी मानकरी आहे.
“झाले मोकळे आकाश’ या मालिकेचे शीर्षकगीत सावनी हिने गायले आहे. त्यासाठी तिला “रापा इंटरनॅशनल पुरस्कार’ मिळाला आहे. “हृदय स्वर’ हे सावनीचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात तिने स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
http://www.sawanishende.com/
Leave a Reply