मधुर पण भारदस्त आवाज लाभलेले गायक #शब्बीरकुमार यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी बडोदा येथे झाला.
शब्बीर शेख हे खरे नाव आलेल्या शब्बीरकुमार यांनी आपल्या आवाजाने ८० व ९० चे दशक गाजवले होते. शब्बीर कुमार यांनी सर्व मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आणि अमिताभ बच्चन ते अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासाठी गाणी गायली. देशभरात नवरारात्रीत कायम गायले जाणारे ‘मर्द’ चित्रपटातील ‘माँ शेरों वाली’ हे प्रसिद्ध गाणे शब्बीर कुमार यांनी गायले होते, जे आजही लोकांच्या हृदयात आहे. शब्बीर कुमार यांनी त्या काळात एकापेक्षा एक हिट गाणी गायली होती, ज्यात ‘तेजाब’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे, ‘सो गया ये जहाँ’, ‘आज का अर्जुन’ चित्रपटातील ‘गोरी है कलाईयां’ आणि ‘घायल’ या चित्रपटातील ‘सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा’ यांचा समावेश आहे. पण १९८५ मध्ये आलेल्या ‘गुलामी’ चित्रपटातील त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे होते. या चित्रपटातील शब्बीर यांनी लता मंगेशकर यांच्या सोबत ज़िहाल-ए-मिस्कीन मकुन ब-रंजिश हे गाणे गायले होते,जे खूपच गाजले होते.
तसेच शब्बीर कुमार व लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मेरी जंग’ या चित्रपटातील ‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ हे गाणे पण खूप गाजले.
शब्बीर कुमार यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=PuUzlmyZEMo
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply