नवीन लेखन...

पेनिसिलीनचा शोध लावणारे सर अलेक्झांडर फ्लेमिंग

Sir Alexander Fleming - The Inventor of Penicillin

सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १८८१ रोजी स्कॉटलंडमधील लोकफेल्ड या ठिकाणी झाला.

त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले.

त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.

सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांची जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी या विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

सर फ्लेमिंग यांचा मृत्यू ११ मार्च १९५५ रोजी लंडन येथे झाला.

सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याविषयीची अधिक माहिती वाचा..

http://en.wikipedia.org/wiki/Alexander_Fleming

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..