सर कोनार्ड हंट यांचा जन्म ९ मे १९३२ रोजी बार्बाडोसमधील एक खेड्यात झाला. ते वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळले . त्यांचे वडील उसाच्या मळ्यात काम करत असत. त्यांचे कुटूंब अत्यंत गरीब होते आणि घरात १० मुले होती. कोनार्ड हंट हे एका खोलीच्या घरात लहानाचे मोठे झाले. ते ६ वर्षाचे असताना त्यांच्या खेड्यामधील मुलांबरोबर क्रिकेट खेळत असत. त्यांची बॅट पाम झाडाच्या फळीपासून बनवलेली घरगुती होती. त्यांच्या वडिलांना त्यांना खूप शिकवायचे होते म्हणून त्यांना शाळेत टाकले , शाळा घरापासून ३ किलोमीटर दूर असल्यामुळे कोनार्ड हंट यांना पायी चालत जावयास लागे , घरात पैसे नसल्यामुळे ते अनवाणी ३ किलोमीटर चालत जात आणि येत असत. शाळेमधील फर्स्ट ११ ची टीम जी १० वर्षाच्या खालच्या वयाची टीम होती त्यातून ते उत्तम खेळले त्यावेळी समोरच्या टीममध्ये त्यांच्यापेक्षा वयाने मोठी मुले होती.
कोनार्ड हंट यांना वयाच्या १२ व्या वर्षी सेकंडरी स्कुलसाठी स्कॉलरशिप मिळली . शाळेच्या खेळाच्या शिक्षकांनी त्यांची हुशारी ओळखली आणि त्यांना शाळेच्या पहिल्या टीममध्ये प्रवेश दिला. त्यांच्या खेळाच्या शिक्षकाने त्याच्याशी पैज लावली होती की त्याने २५ धावा केल्या की त्याला एक शिलिंग मिळेल. शाळेच्या शेवटच्या वर्षात हंट शाळेच्या टीमचे कप्तान होते. शाळेच्या शेवटच्या वर्षात असताना हंट यांना बेलिप्लेन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबकडून खेंण्यासाठी विचारणा झाली. बेलिप्लेन त्यावेळी बार्बाडोस क्रिकेट लीग मधून खेळत असे. बार्बाडोसमधील गरीब आणि खेडेगावातील मुलांना तेथे खेंण्यास संधी मिळत असे. शांत त्यातून खेळले आणि त्यांनी १३७ धावा केल्या त्या बार्बाडोस क्रिकेट लीगमध्ये हंट हे त्या वर्षी पहिले शतक करणारे खेळाडू होते.
लवकरच कोनार्ड हंट यांची फर्स्ट क्लास सामन्यासाठी निवड झाली ती बार्बाडोसविरुद्ध त्रिनिनाद अँड टोबॅको यांच्यामधील सामन्यासाठी त्यांनी तो सामना ब्रिगटाऊन येथील किंगस्टन ओव्हल येथे खेळला गेला. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ६३ धावा केल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये १५ धावा केल्या. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटची करिअर हळूहळू चालू होती त्या दरम्यान ते शाळेमध्ये शिक्षकाचे काम करत होते. त्यानंतर त्यांनी सिव्हील सर्विसेस मध्ये कारकुनाची नोकरी केली मग इन्शुरन्स ऑफिसमध्ये नोकरी केली. जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ आला १९५४-५५ मध्ये होता तेव्हा त्यांना फारसे काही करता आले नाही कारण पहिल्या इनिंगमध्ये ते शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये ३ धावांवर बाद झाले. परंतु पुढे जेव्हा इंग्लंडची टीम तेथे आली होती तेव्हा मात्र त्यांनी १५ आणि ९५ धावा दोन सामन्यामध्ये केल्या.
कोनार्ड हंट यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो १७ जानेवारी १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध किंगस्टन ओव्हल येथे त्यांच्या होम ग्राउंडवर . त्यांनी पहिले दोन चेंडू फजल मेहमूदला मारले आणि चार धावा काढल्या त्या इनिंगमध्ये त्यांनी १४२ धावा पहिल्या काढल्या. त्याच सिरींजमधील तिसऱ्या सामन्यात त्यांनी २६० धावा काढल्या आणि गारफिल्ड सोबर्सबरोबर ४४६ धावांची भागीदारी केली. त्यावेळी सोबर्स यांनी नाबाद ३६५ धावांचा त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता पुढे तो ब्रायन लाराने तो मोडला हे सर्वाना माहीत आहे त्यावेळी वेस्ट इंडिजने डाव घोषित केला तो ३ बाद ७९० धावा. पहिल्याच सिरीजमध्ये कोनार्ड हंट यांनी ७७.७५ या सरासरीने ६२२ धावा केल्या. ती सिरीज वेस्ट इंडिजने ३ – १ ने जिंकली. १९६५ मध्ये ऑस्ट्रलियाविरुद्ध खेळताना त्यांनी ६ अर्धशतके १० इनिंग्समध्ये मध्ये केली त्यावेळी त्यांच्या सर्वात जास्त धावा होत्या ८९ आणि सरासरी होती ६१.११ . हा एक रेकॉर्ड होता पुढे तो रेकॉर्ड माईक आथरटन याने मोडला.
सर कोनार्ड हंट यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला तो १८ जानेवारी १९६७ रोजी भारतीय संघाविरुद्ध. त्यांनी ४४ कसोटी सामन्यामध्ये ३२४५ धावा ४५.०६ या सरासरीने केल्या त्यामध्ये त्यांनी ८ शतके आणि १३ अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती २६० धावा . त्यांनी १३२ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ८९१६ धावा केल्या त्या ४३.९२ या सरासरीने त्यामध्ये त्यांनी १८ शतके आणि ५१ अर्धशतके केली तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २६३ धावा.
त्यांना क्रिकेटमधील सर्व प्रकारचे सन्मान मिळले आणि त्यांनी कोच म्हणून देखील काम पाहिले.
सर कोनार्ड हंट यांचे ३ डिसेंबर १९९९ रोजी सिडने , न्यू साऊथ वेल्स येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply