नवीन लेखन...

सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पूर्वीच्याकाळी म्हणजे साधारण इ.स.पू. ९०० मध्ये लढताना एखादा भाल्याचे टोक, बाण, तलवार, गोळी अश्या गोष्टी डोक्याला लागून जखम होऊ नये म्हणून डोक्यावर सर्वात जुनी शिरस्त्राणे सैनिक वापरत असत जी चामड्याची किंवा धातू पासून बनविलेली असत. कालांतराने यात बदल होत गेला वजनाने हलकी आणि मजबूत अशी प्लास्टिकची शिरस्त्राणे (हेल्मेट) बनविण्यास सुरुवात झाली. जी लढाई व्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी वापरली जात आहेत. जसे क्रिकेट, आईस हॉकी, सायकलिंग तसेच सगळ्याप्रकारच्या साहसी खेळात आणि अंतराळ सफरीतही वापरली जातात. मुख्य उद्देश असा की दुर्दैवाने काही अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत होऊ नये.

सध्या राज्यात दुचाकी चालकांना सक्तीच्या हेलमेट वापरण्याचे फर्मान निघाल्यामुळे नागरिकांत जरा घुष्याचे किंवा विरोधाचे वातावरण आहे. पण एखादा अपघात झाल्यास स्वसंरक्षणासाठी आणि सह प्रवाश्यांनीही डोक्यावर हेल्मेट वापरणे त्याच्याही डोक्याच्या रक्षणासाठी उपयोगी आहे तसेच त्यात काही वावगे नाही.

वाहने उभी करण्यासाठी वाहन मालकाकडून जोपर्यंत जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात नाही, तोपर्यंत वाहनांची नोंदणी होणार नाही, अशी अट घालण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. यातून पार्किंगची समस्या किती मोठी आहे हेच न्यायालयाने दाखवून दिले होते.

चारचाकी वाहनाने मुंबईत पार्क करणे म्हणजे डोकेदुखी झाली आहे म्हणून की काय दुचाकी वाहनांना अधिक पसंती दिली जाते. शहरातील गर्दीतून वाट काढीत आपल्याला इच्छित स्थळी पोहोचविणारे, महिलांना चालविण्याच्या दृष्टीने हलके आणि किफायतशीर वाहन असल्याने दुचाकीला विशेषत: महिलांकडून सध्या पसंती दिली जात आहे. आता तर सुलभ हप्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनेही सहज मिळत असल्याने वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. दुचाकीमध्ये मोटरसायकल, स्कूटर आणि मोपेड यांची संख्या लक्षणीय वाढली असून राज्यातील एकूण वाहनांत ७५ टक्के दुचाकींची संख्या आहे. अर्थात चारचाकी कारची संख्या १५ टक्के असून त्याखालोखाल ट्रक आणि लॉरी या मालवाहू अवजड वाहनांची संख्या पाच ते सहा टक्के इतकी आहे.

सध्या हेलमेट सक्तीचा प्रश्न ऐरणीवर असल्याने दुचाकी वाहन चालकांमध्ये बरेच समज-गैरसमज आहेत. परंतु काही असले तरी दुचाकी स्वाराच्या एखाद्या नजर चुकीमुळे किंवा नियमांचे पालन न करता गाडी सुसाट वेगात चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते किंवा समोरून येणाऱ्या गाडीशी होणाऱ्या टक्करीमुळे अपघात होऊन डोक्याला मार बसण्याची शक्यता जास्त असते अश्यावेळी चालवणारा आणि त्याच्यापाठी बसणाऱ्या व्यक्तीने डोक्यावर हेल्मेट घातले असेल तर डोक्याला जबर मार बसण्यापासून टाळता येते.

हेल्मेट न वापरण्याची कारण पुढीलप्रमाणे :
१) उन्हाळ्यात गरम होतं २) श्वासघेण्यास अडचण येते ३) हेल्मेटच्या काचेवर चरे पडतात आणि दुचाकी चालवता त्रास होतो ४) घामामुळे आणि डोक्यावर तेल लावलेले असल्याने हेल्मेटला कुबट वास येतो ५) काही कालांतराने हेल्मेट घट्ट बसत नाही अनुवठी दुखू लागते आणि अशी बरीच काही.
हेल्मेट कसे निवडावे याबद्दलची तज्ञांची मते पुढे देत आहे :-
१) घमेलं दिसतं तसलं हेल्मेट निवडावं ज्याने कान मो़कळे राहतात. डोळ्यांच्या कोपर्यातून मागच्या गाड्यांचा अंदाज येतो. दोन्ही साईडला रेअरव्हीवू मिरर मधून बघण्यास अडचण येत नाही. फक्त हे हेल्मेट शहराबाहेर चालत नाही त्यासाठी लष्करातील जवान वापरतात तसलं हेल्मेट वापरण्यास हरकत नाही. त्याचे दोन फायदे आहेत. तोंड पूर्ण उघडं राहतं कानही झाकले जातात. चष्मा लाऊन सुद्धा वापरता येतं.
२) नुसता ब्रँडवर जाऊ नये प्लास्टीक क्वालीटी आणि बेल्टची क्वालीटी बघून घ्यावी.
३) मित्र वापरतो म्हणून तुम्हीं वापरू नका तुमच्या डोक्यावर कसे बसते, त्रासदायक तर नाही ना?
४) हेल्मेटवर रंगीत रेडीयम असते. बर्‍याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो.
५) हेल्मेट कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, आर्थिकदृष्ट्या परवडणारे, चेहेर्‍याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात.
६) ‘खुले’ व ‘बंद’ प्रकाराचे हेल्मेट असतात. खुले म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व बंद म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्‍याचे) संरक्षण करणारे हेल्मेट. खुल्या हेल्मेटमुळे फक्त कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून बंद प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. काही जणांना बंद प्रकारच्या हेल्मेटमध्ये कोंडल्यासारखे होते. कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात. ज्याच्यात्याच्या आवडीनुसार आणि प्रकृतीनुसार घ्यावे.
७) भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाने ‘बंद’ प्रकारातले हेल्मेट घ्यावे. एकदाका त्याची सवय झाली की मग चिंता नाही.
८) रस्त्यावरचे हेल्मेट स्वस्त मिळते म्हणून कधीही घेवू नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. त्याचे प्लास्टीक, फायबर कमी दर्जाचे असू शकते. त्याचे पट्टे रिबीटने बसवलेले असू शकतात. त्याच्या आतील कापडाचा दर्जा कमी असू शकतो. त्यातील फोम, थर्मोकोल कमी दर्जाचे असू शकते. त्याची काच कमी ग्रेडची, अपारदर्शक असू शकते. विक्रेत्याचे दुकान नसल्याने पळून जावू शकतो. विक्रेता बिल देवू शकत नाही अशी अनेक करणे आहेत.
९) हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येईल असेच निवडा पुढेपुढे आतील थर्मोकोलचा आकार तसा घडेल. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
१०) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा. त्याच्या लॉकचा “टक्क” असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट असुरक्षित आहे.
११) कालांतराने हेल्मेटचे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला घट्ट होतील असे करत रहा.
१२) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असतील, त्यातील गिअरमधून पडत असेल तर बदलवून घ्या.
१३) काळ्या रंगाची काच असलेले हेल्मेट कधीही घेऊ नका. फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.
१४) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही हे लक्षात ठेऊन दोन-पाच वर्षानी खिश्याला परवडेल अश्या रीतीने बदलणे गरजेचे आहे.
१५) एकदा तुम्ही हेम्लेट गाडी चालवतांना सतत वापरल्यास भविष्यात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तुम्हाला आवडणार नाही आणि ते स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी हिताचेही असणार नाही. म्हणून “सीर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास”

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..