नवीन लेखन...

सर विवियन रिचर्डस स्टेडियम

सर विवियन रिचर्डस् स्टेडियम हे मैदान वेस्ट इंडिज मधील अॅन्टिगुआ येथे आहे. या स्टेडियमचे बांधकाम मुख्यत्त्वे २००७ च्या वर्ल्ड कप सामन्यांसाठी करण्यात आले. जेथे सुपर ८ मॅचेस खेळविण्यात आल्या होत्या. या मैदानाची आसन क्षमता ही १०,००० आहे. परंतु वर्ल्ड कप २००७ च्या क्रिकेट सामन्यांच्या वेळेस जवळ जवळ दुप्पट आसन व्यवस्थेची तात्पुरती सोय येथे करण्यात आली होती.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कप्तान विवियन रिचर्डस् यांचे नाव या मैदानाला सन्मानपूर्वक देण्यात आले. वेस्ट इंडिजची राजधानी सेंट जॉन आणि व्हिसीबर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे मैदान १० ते २० मिनिटांच्या अंतरावर आहे.

साधारण ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका खर्च ह्या  स्टेडियमच्या उभारणीसाठी लागला आहे. या रकमेतील बराच मोठा भाग चिनी सरकारने देणगीच्या स्वरूपात दिला आहे. या मैदानावर ३० मे २००८ रोजी पहिला क्रिकेट सामना खेळला गेला जो वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघा दरम्यान खेळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला.

या स्टेडियमवर नॉर्दन स्टॅण्ड आणि पाच मजली असलेल्या साउथ स्टॅण्डची उभारणी करण्यात आली. पण २००८ मध्ये साउथ स्टॅण्डचे छप्पर वादळामुळे उध्वस्त झाले. याशिवाय या स्टेडियमवर एक विशेष सुविधा उपलब्ध केली गेली आहे ती म्हणजे त्यात विविध संघांच्या खेळाडूंना सरावासाठी एक विशिष्ठ धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच एक कृत्रिम किनारा तयार करण्यात आला आहे.

ह्या बेटाला एकंदर ३६५ नैसर्गिक किनारे आहेत. परंतु त्यापैकी अनेक किनाऱ्यांचे १९९५, १९९८ आणि २००० मध्ये आलेल्या प्रचंड वादळामुळे नुकसान झालेले आहे. हा कृत्रिम किनारा ‘बीच ३६६ या नावानी ओळखला जातो. येथे खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्व सोयी -उपलब्ध असून तेथे मिडिया सेंटरची उभारणी देखील करण्यात आलेली आहे. सर विवियन रिचर्डस् मैदान तेथील काही मैदानांपैकी ‘कला आणि क्रीडेचे एक केंद्र आहे. या मैदानात क्रिकेट संघाला बाहेर पडण्यासाठी एक भूमिगत रस्ता तयार करण्यात आला आहे.

१३ फेब्रुवारी २००९ला येथे वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरू असतान केवळ १० चेंडू खेळून झाल्यावर मैदानाच्या धोकादायक अवस्थेमुळे हा सामना रद्द करावा लागला होता. पुरानंतर मैदानावर शिल्लक राहिलेल्या वाळूच्या थरामुळे हा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे या सामन्यानंतर काही महिने हे स्टेडियम बंद ठेवण्यात आले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..