अनेक मराठी कलाकार आता सातासमुद्रापार जाऊन आपली कला सादर करतात. मात्र एकाद्या लाईव्ह शो पुरतेच मर्यादित राहिलेले हे सादरीकरण आता थेट हॉलिवूड चित्रपटापर्यंत पोहोचले आहे.
पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत.
`अमंग द बिलिव्हर्स (Among The Believers)’ हा चित्रपट पाकिस्तानातील मुल्तान या भागात चित्रित केला गेला. त्यामुळे यात `राग मुल्तानी’चा वापर केला गेला. पाकिस्तानातील `लाल मशीद (Red Mosque)’ आणि मौलाना अझीझ यांचा ISIS आणि तालिबान या अतिरेकी संघटनांना पाठिंबा असल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर कडव्या संघटना आणि पाकिस्तानी नागरिक यांच्यातील संघर्ष या चित्रपटात रंगवला आहे.
हा चित्रपट आता `हॉलिवूड फिल्म फेस्टिव्हल २०१५’ मध्ये दाखवला जाणार आहे. आतापर्यंत Sidney Film Festival, Triberca Film Festival , AFI Docs Washington, DMZDocs South Korea, Miami South Asian Festival, Vancouver International Film Festival, International Film Festival Goa अशा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला आणि प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने ८-९ अवार्डही मिळविली.
या चित्रपटाचा ट्रेलर यु-ट्युबवर बघायला मिळतो.
Film trailer: https://www.youtube.com/watch?v=MSklZY_VCIM
Hollywood Fim Festival : https://www.youtube.com/watch?v=R-fZSdHftVA
Review In Tribeca Film Festival World Premier : https://www.youtube.com/watch?v=SKTnZIVp2YM
Leave a Reply