त्या दिवशी आम्ही शाळेत गेलोच नाही. एकतर उशीर ही झाला होता आणि आम्ही त्या सगळ्या कहाणीने भारावून गेलो होतो. आमचा विश्वासच बसत नव्हता. एका हिंदू घरात ही आईवडिलांनी सोडून दिलेली दुसऱ्या धर्माची मुलगी वाढली होती. तिच्या मामा मामींनी इतके चांगले संबंध ठेवले होते. ती दोनही कुटुंबे धर्माच्या लक्ष्मणरेषेला ओलांडून पुढे आली होती आणि एकत्रित झाली. एकाच घरात नमाजही अदा होत होता आणि अथर्वशीर्षही म्हंटले जात होते.
कोतवाल तिच्या मामा-मामी विषयी अतिशय आदराने बोलत होते. इतकेच नव्हे तर सीताराला उर्दू आणि नमाज शिकवायला येणाऱ्या शिक्षकाचे पण ते भरभरून कौतुक करत होते.
त्या सगळ्याचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. आता आम्हाला शाळेत निर्णय द्यायचा होता. तसा तो देणे आता फारसे अवघड राहिले नव्हते. तरीही शिक्षकवर्गाला तो पटवून देणे अतिशय आवश्यक होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत पोहोचलो. इनाम्दारांब्रोब्र संपूर्ण चर्चा केली. त्यांना देखील तिच्या विषयी संपूर्ण माहिती नव्हती. कोतवालांना ती मुलीसारखी आहे आणि ती लहानपणापासून त्यांच्य्कडेच आहे एवढीच माहिती होती. त्यांच्यासाठी ती एक कर्तव्यदक्ष शिक्षिका होती. आम्ही तिघांनी आता पुढे कसे जायचे यावर बरीच चर्चा विचारणा केली.
आणि मधल्या सुट्टी नंतर सितारा सोडून इतर सर्व शिक्षकांना स्टाफ-रूम मध्ये बोलावून घेतले. सगळे शिक्षक एकत्रित झाल्यावर प्रथम देशमुखांना विचरले, “दो दिवसांपूर्वी तुम्ही आमच्याकडे सितारा विषयी तक्रार घेऊन आला होतात बरोबर ना?” “हो बरोबर आहे” ते म्हणाले.
“आता मी तुम्हाला काही प्रश्न विचरतो, तुम्ही उत्तरे द्या.” ठाकूर म्हणाले. “पहिला प्रश्न, ती मुलांना खरोखरीच शिकवते कि नाही?” “हो ती शिकवते हे तर नक्कीच. मुलांना भरपूर मार्क्स मिळतात हे ही सत्य आहे.” देशमुख म्हणाले. “ दुसरा प्रश्न पाटील तुम्हाला विचारतोय, तुम्हाला माहित आहे की ही मुलांना खरोखरीच शिकविते; तर ती दुसऱ्या धर्माची आहे म्हणून तिला सवलत दिली गेली आहे. असे विधान तुम्ही का केले?’ काही क्षण पाटील गप्प राहिले. बहुतेक काय बोलावे हे त्यांना समजत नव्हते. काहीतरी बोलयचे म्हणून बोलले, “तिच्या सारखे शिकवण्यासाठी इथे अनेक शिक्षक तयार आहेत, त्यांना कुठे काय सवलत मिळते?” मी सर्व शिक्षकांना विचरले, “पाटील सरांचे असे म्हणणे आहे की तुमच्यापैकी काही लोकांची मुलांना ह्या प्रकारचे शिक्षण देण्याची इच्छा आहे. सांगा तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे? आम्ही तुच्यासाठी काय सवलत देता येईल याची ताबडतोब विचारणा करतो.”
यावर एक नाही कि दोन नाही. सगळेच गप्प. कोणी काही बोललेच नाही. मी पाटील सरांकडे नुसती नजर फिरवली. तसे ते बोलले, “सर, आत्ता कोणी काही बोलत नाही. परंतु पाठीमागे सगळे आपापसात कुजबुजत असतात”.
मी म्हणालो, “ पाटील बाकी सगळ्यांचे सोडा. पर्वा तुम्हीच आला होतात ना तक्रार करत? आता मी तुम्हाला सांगतो ऐका. हा तुमचा धर्मवाद जरा बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला एका वर्गाची उद्यापासून सोय करून देतो. तुम्ही स्वतः उद्यापासून मुलांना extratime देवून शिकविणे सुरु करा.”
“परंतु सितारासारखे विनामूल्य” ठाकूर एकदम बोलून गेले.
पाटील गोंधळले, आम्ही देशमुखांना सोडून त्यांच्याच पाठी पडलो आहोत असेही त्यांना काही खान वाटले असावे. परंतु हा प्रश्न तर आम्ही त्यांना सरळच विचारला होता. त्यांचा नाईलाज होता, त्यांना उत्तर देणे भागच होते. “सर, माझे काय आहे, माझे आईवडील म्हातारे आहेत. ते जवळच्याच एका गावात भावाजवळ रहात असतात बरेच वेळा मला त्यांना भेटण्यासाठी जावे लागते. त्यामुळे मला हे सध्या शक्य होणार नाही.” हे सांगताना त्यांना बहुदा लाज वाटत असावी, ते खाली बघूनच बोलत होते. आमच्या नजरेला नजर मिळविण्याची त्यांना हिम्मत होत नसावी.
मी म्हणालो, “असे जर होते, कि तुम्हीही करू शकत नाही, हे इतर लोकही तयार नाहीत तर तुम्ही ह्या प्रकरणाला उभे का केलेत? त्याचा ध्र्म्वडत रुपांतर करण्याचा प्रयत्न का केलात? असे करणे तुमच्या सारख्या शिक्षकाला शोभा देत नाही. तुमच्या ह्या कृत्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गाला कलंक लागू शकतो ह्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? तुम्ही ह्या मुख्याध्यापकांवर देखील मिथ्या आरोप केला होता. कायद्याने हा गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. योग्य ती कारवाई आम्ही का करू नये ते सांगा.”
पाटील एकदम कावरेबावरे झाले. देशमुखांकडे बघायला लागले. बहुतेक देशमुख त्यांच्या मदतीला धावून येतील अशी त्यांची अपेक्षा असेल. परंतु तसे काही झाले नाही. शेवटी पाटील शरमेने मान खाली घालून बसून राहिले.
‘”जोशी, तुम्ही म्हणत होतात की, सितारा खोटे बोलते. ती विनामुल्य शिकवीत नाही. ती मुलांकडून गुपचूप फी घेते. तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का? असेल तर तो तुम्ही द्या” मी जोशींना सांगितले..
“सर, पुरावा म्हणजे तसा लेखी काही नाही. परंतु काही पालक असे म्हणत होते. ते माझ्या ऐकण्यात आले होते.” जोशी म्हणाले.
“जोशी, तुम्ही उद्या त्या पालकांना घेऊन या आणि मला भेता. कधी भेटू शकता?” ठाकूर म्हणाले.
तसे जोशी पण जरा विचारात पडले. ते कुलकर्णी बाईंकडे पाहत होते. त्या काहीच बोलेनात तेंव्हा उसने अवसान आणून जोशी म्हणाले, “मी तसा प्रयत्न करतो पण आता मला त्या पालकांची नवे देखील लक्षात नाहीत.”
त्यांची अशी विचित्र अवस्था बघून कुलकर्णी बाई म्हणाल्या “हे तर सगळे ठीक आहे पण तिचे चाल चलन तर बघा. कुठेतरी कोणाकडे तरी राहणारी बाई. मुलांच्या मनावर अशा गोष्टींचा काय परिणाम होईल याचा तर विचार झाला पाहिजे नाही का?”
मी हसलो. कुलकर्णी बाईंकडे वळून काही बोलेन तितक्यात ठाकूर म्हणाले, “कुलकर्णी बाई, तुम्ही इथे किती वर्षापासून नौकरी करत आहात?’
“सर, गेल्या दहा वर्षापासून इथेच आहे.” त्या म्हणाल्या.
“ मग तुम्हाला खरेच माहिती नाही कि कोणाकडे राहते? कि तुम्ही कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाहीत?” ठाकूर म्हणाले.
“कोणाच्या भानगडीत डोकावून बघायला मला आवडत नाही.” तावातावाने त्या म्हणाल्या.
इतका वेळ मी गप्प राहिलो होतो. पण आता मात्र थोडासा चिडलो होतो. तरी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणालो, “ कुलकर्णी मॅडम मी बराच वेळापासून ऐकत आहे आणि परवा तुम्ही आम्हाला भेटायला आला होतात तेंव्हा देखील असेच म्हणाला होतात कि तिचे चाल-चलन ठीक नाही. ती कोणाकडे तरी रहाते. माझी एक तुम्हाला विनंती आहे कि असे मोघम-मोघम बोलू नका. मला नक्की सांगा कि ती कोणाबरोबर आणि कुठे राहते?चाल-चलन ठीक नाही म्हणजे काय? तिला शाळेत भेटायला कोणी येते का? किंवा शाळेतून बाहेर गेल्यावर तिचे कोणाबरोबर प्रेम-प्रकरण आहे का? अशी काही ठोस माहिती तुमच्याकडे असेल तर ती निःसंकोचपणे सांगा. तसा तुम्ही तिच्यावर आरोप केला आहे. आणि तो सिद्ध करायला लागेल. नाहीतर तुम्ही सुद्धा करविला पत्र होऊ शकता.”
तशा कुलकर्णी बाई ग्द्ब्दल्या, त्या पाटील सरांकडे आशेने बघायला लागल्या. पाटीलने देशमुखांकडे बघितले.
“तसे नक्की काही सांगता येणार नाही. पण लोक तर बोलतातच ना” त्या म्हणाल्या.
“लोक म्हणजे कोण? एकत्र त्यांना पूर्ण माहिती विचारून या नाहीतर बोलणाऱ्यांना उद्या इथे हजर करा.” ठाकूर म्हणाले.
आता मात्र मला राग अनावर झाला आणि जोरातच म्हणालो, “ बघा बाई, त्या दिवशी तुम्ही ही तक्रार करण्यासाठी रात्री उशिरा आम्हाला भेटायला आला होतात ना. आणि इनामदारांना दिलेल्या अर्जावर तुम्ही सही केलीत, ती काय उगाचच?तुमच्याकडे काहीही ठोस पुरावा असल्याशिवाय केलीत? तुमच्या सारखी सुशिक्षित बाई असे कसे करू शकते? आणि त्यातून तुम्ही हे सगळे केलेच असेल तर कोणाच्या सांगण्यावरून केलेत? तुम्हाला हे माहितच असेल कि कोणाच्या चारित्र्यावर खोटे शिंतोडे उडविले आणि हे जर सिद्ध झाले तर तो माणूस तुच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा लावू शकतो. तसे झाले तर ते तुम्हाला खूप महागात जाईल हे तुमच्या लक्षात येते आहे का?”
त्या थोड्या गप्प बसल्या. परत एकदा पाटीलांकडे बघितले आणि म्हणाल्या “ निदान ती मिर्झा असून कोत्वालांकडे राहते हे तर खरेच आहे ना. उगाचच वर्षनुवर्ष कोणी किनाकडे राहत नाही. अगदी सख्ख्या मुलीला देखील कोणी ठेवत नाही.”
इनामदार माझ्या कानात बोलले, “सर, मला वाटते कि आता आपण सीताराला बोलवावे. पुढचे सगळे तिच्या समोरच झालेले बरे.”
मला त्यांचे म्हणणे योग्य वाटले. म्हणून आम्ही तसे करण्याचे ठरविले. शिपायाने सिताराला बोलवून आणले. एकदम सगळी मिटिंग पाहून ती जरा आश्चर्यचकितच झाली होती. इनामदारांनी तिला बसायला सांगितले, व साधारण कल्पना दिली. नंतर ठाकुरांनी तिच्या विरोधात आलेला अर्ज वाचून दाखविला. ती शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते.
मी तिला सांगितले, “एका तासापूर्वी पासून ही मिटिंग चालू आहे. आत्तापर्यंत तुझ्याविरुद्धचा एकही गुन्हा शाबित झालेला नाही. आता एक शेवटचा प्रश्न कुलकर्णी मॅडम विचारत आहेत. तो म्हणजे तू मिर्झा, आणि कोतावालांकडे कशी रहात आहेस, आणि तुझे त्यांच्याबरोबर काय नाते आहे? ह्याचे उत्तर तू त्यांना देऊ शकतेस का?”
कुलकर्णी मॅडमचा चेहरा एकदम खुलला होता. त्यांना वाटत होत आत्ता कुठे,”उँट फड के नीचे आ गाय.” एकदम वरमानेने त्या तिच्याकडे बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा द्वेष स्पष्ट दिसत होता.
थोड्या शांततेनंतर सितारा उभी राहिली. तिने डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपले आ शांतपणे बोलण्यास सुरवात केली. “ कोतवालांचे आणि माझे काय नाते आहे हे मी यांना कितीही ओरडून जरी सांगितले तरी ते त्यांना समजणार नाही, ते समजण्याची त्यांची लायकीही नाही आणि इतकी त्यांच्या बुद्धीची पातळीही नाही, मी असे शब्द वापरणे उचित नाही हे मला मान्य आहे. परंतु ह्या लोकांसाठी हाच शब्दप्रयोग योग्य आहे. कोतवालांची मी मुलगी आहे हे मी ओरडून ओरडून सांगितले तरी ह्यांना काय समजणार?
सर, मी लहान असतानाच माझे वडील मला व माझ्या आईला सोडून दुबईला गेले. तिथे त्यांनी दुसरा विवाह केला. पुढील दोन तीन वर्षे ई नौकरी करून मला वाढवत होती. त्या पूर्वी देखील ती वडिलांबरोबर कामावर जात असे म्हणून मी लहानपणापासुनच कोतवालांच्या पाळणाघरात रहात असे. मी त्यांच्याकडेच मोठी होत होते. मला त्यांचा खूप लळा होता. दोन-तीन वर्षानंतर माझ्या आईनेही दुसरे लग्न केले. ती मला तिच्याबरोबर घेऊन जात होती. परंतु मी गेले नाही. माझ्या मामा-मामींची मी खूप लाडकी आहे. तो मला घेऊन त्याच्या घरी गेला होता. पण कोतवालांची म्हणजे माझ्या “आईबाबांची” मला खूप आठवण येत असे. मी खूप हट्ट केला, आजारी पडले. अन्नपाणी टाकून दिले. शेवटी मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते तेंव्हा माझ्या मामांनी त्यांना बोलावून घेतले होते. माझ्यासाठी ते त्या काळी धावत पळत माझ्या मामांकडे मुंबईला आले होते. आणि मी त्यांच्या पाठी पडून त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी आले होते. तेंव्हा पासून मी कोतावालांकडेच आहे. ते माझे आई व बाबा आहेत. आणि मी त्यांची मुलगी आहे. माझे सख्खे रक्ताचे नाते असलेले आईबाबा मला टाकून गेले. आणि ह्यांनी मला मोठी केली, शिकविले. माझे मामाबरोबरचे नाते तोडले नाही. मला उर्दू शिकविले, कुरण वाचायला शिकविले, माझे माझ्या धर्माबरोबरचे किंवा नावा बरोबरचे नाते ण तोडता त्यांनी मला मुलगी म्हणून मोठी केली. त्यांचे माझे हे नाते ह्या लोकांना नाही समजणार. अशा ह्या बुद्धिहीन लोकांबरोबर वाद घालण्यापेक्षा मी ह्या सगळ्यांपासून दूर झाले. माझा अशोक दादा मला नेहमी सांगत असतो अश्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जा. लहानपणापासून जगाचे असे विचित्र अनुभव घेवून मी थकले आहे आता. सर, ही माझी कहाणी आहे.
तुम्हाला सत्य वाटत नसेल तर ठीक आहे, परंतु हेच सत्य आहे.
सर, आता ह्या गोष्टी ऐकून मी थकले आहे. माझे डोके शिणले आहे. आता मी माघार घेतली आहे. ह्या मुलांसाठी मी एवढे कष्ट का घेत होते ह्याची कुणालाही कल्पना नाही. माझी एकच विचारधारा होती, कि कुणीतरी मला ह्या समाजात, ह्या जगात सन्मानानी उभे करण्यासाठी जगाचे टप्पेटोणपे खाऊन, मदत केली आहे. ते माझ्या रक्ताचे नातेवाईकही नव्हते. कुठेतरी ह्या कर्जाची परतफेड म्हणून मी अनेक मुलांना शिक्षण देऊन त्यांना जगात सन्मानाची जागा मिळविण्यासाठी मदत करण्याचे ठरविले होते. आणि ते मी स्वखुशीने करत होते.” सगळ्या खोलीत शांतता पसरली होती.
तिला थोडा धीर देण्यासाठी मी म्हणालो, “ सितारा, काल आम्ही चौकशीसाठी तुझ्या घरी गेलो होतो. तुझ्या बाबांनी म्हणजे कोतवाल साहेबांनी ही सर्व कहाणी सांगितली होती. हे सगळे आम्ही सुद्धा या शक्षकांना सांगू शकलो असतो. परंतु माझी इच्छा होती कि हे तुझ्या तोंडून त्यांना कळावे. काल मी तुझे लहानपणीचे काही फोटो पहिले. योगायोग कसा असतो बघ, राशिद म्हणजे तुझे वडील म्हणजे माझा विद्यार्थी होता. त्याला मी फोटोमध्ये ओळखला. आणि दुबईला जाण्यापूर्वी तो तुला व तुझी आई शबनमला बरोबर घेऊन मला भेटायला सुरतला माझ्या घरी आला होता. त्या वेळेस तू खूपच लहान होतीस. तेंव्हा माझे सुरतला posting होते. असो.
कुलकर्णी मॅडम व पाटील तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का तिच्याकडून?आत्ताच विचार. सगळा स्टाफ आणि आम्ही सगळे उपस्थित आहोत. मागाहून शंका नकोत”.
ते दोघेही गप्प बसले होते. देशमुख तर मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. त्याला आता तर कोणी कुत्रेही विचारणार नव्हते हे तर नक्कीच होते.
मी म्हणालो,”कुलकर्णी बाई, सगळे जग दिसते तसे नसते. तुम्ही देखील पाटील सरांच्या सोबतीने राहत आहात असे तुम्हीच सांगितलेत म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध काही पण बोलावे का? हे योग्य होईल का? काय वाटते तुम्हाला?” त्या काही पण बोलल्या नाहीत. त्यांनी मान खाली घातली.
इनामदार म्हणाले, “सर, ह्या चौघाविरुद्ध कारवाई करावी लागेल ना?” मी होकार दिला.
सितारा म्हणाली, असे काही करू नका सर, मी माझी शाळा संपली कि घरी जाईन. कुठलाही extra-class घेणार नाही. म्हणजे ह्यातला कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही. आणि अशीही आता माझ्यामध्ये कुणाशी लढण्याची ताकदही राहिलेली नाही.”
ठाकूर म्हणाले, “सितारा, तू असे काहीही करणार नाहीस. तू ज्या आत्मीयतेने मुलानंस अत्तापर्यंत शिकवीत होतीस, ते काम तुला तसेच करायचे आहे. तुझा आम्हाला गर्व आहे. तुझ्या ह्या उत्तम कामगिरीबद्दल ‘सरस्वती विद्यालयाच्या’ समितीमार्फत तुला पुरस्कार देण्याचे कालच आपले मुख्य ट्रस्टी प्रागजीभाई शेठ यांनी नक्की केले आहे.”
ती रडवेली झाली होती. मी तिला समजाविले, “ हे बघ सितारा, हे जीवन आहे ना, हा एक संघर्ष आहे. इथे जो आपटून आपटून परत उभा राहतो तो जिंकतो. जीवन एक ‘रेस ‘ आहे. रेसमध्ये धावताना पायात गोळे आले तरी आपण धावत रहातो. थकून जातो तरीही धावत राहतो. आपण असे का करतो? कारण आपल्याला एक लक्ष्य साध्य करायचे असते. जीवन तसेच आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचणे हेच मुख्य असते. मुलांना शिकविण्याच्या तुझ्या लक्षावर तू केंद्रित राहा. ह्या आयुष्याच्या मॅरॅथॉन मध्ये धावत राहणे हाच सृष्टीचा नियम आहे. आपल्या हातात विधीचा लगाम नसतो बेटा. विधिलिखित आपण बदलू शकत नाही. परंतु समोर येणाऱ्या अनेक समस्यांशी झुंजण्याची शक्ती आपल्याकडे असते. इथे काही पण अशक्य नसते. फक्त आत्मविश्वासाने पावले उचलावी लागतात. ह्या आत्मविश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नसतो. शत्रू नेहमीच या आत्मविश्वासावरच वार करण्याचा प्रयत्न करतो. तू हरून जाऊ नकास. आत्मविश्वासाने परत उभी राहा . आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.”
तिने शांतपणे सगळे ऐकून घेतले, आणि मानेनेच होकार दिला.
इनामदारांनी बाकी स्टाफला परत विचारले, “कोणाला काही शंका आहे? अजून ती इथेच आहे तर विचार.”
बऱ्याच लोकांनी तिची माफी मागितली. आम्ही त्यांना “मिटिंग संपली, तुम्ही जाऊ शकता” असे सांगितले. सिताराही आमची परवानगी घेऊन घरी गेली. जाण्यापूर्वी उद्यापासून extra-classes चालू करीन हे वचन देऊन गेली. आणि मला म्हणाली, “सर तुम्ही सांगितलेला एक एक शब्द लक्षात ठेवीन”.
फक्त देशमुख, पाटील, जोशी आणि कुलकर्णी बाई यांना आम्ही थांबविले व “तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल” असे सांगितले.
संध्याकाळी डाकबंगल्यावर येऊन निवांत आरामखुर्चीत बसलो. चहा घेतला . डोके जरा शांत झाले होते.
रात्री अशोक आम्हाला भेटायला आला आणि म्हणाला,”बाबा तुम्हाला भेटायला येऊ शकत नाहीत. म्हणून मला पाठविले आहे. त्यांनी तुम्हाला धन्यवाद दिले आहेत. आमच्या सीताराला तुम्ही एकदा परत मानाने उभी राहण्याची हिम्मत दिली आहे. आम्ही तुमचे आभारी आहोत.”
ठाकूर म्हणाले, “खरे तर तुम्ही ह्या जगाला एक उदाहरणरूप आहात.
तुमाच्याचकडून जगणे शिकावे. अरे, अशोक ह्या जगात तुमची सारखी माणसे असतील तर किती शांती नांदेल? बाबांना आमचा नमस्कार सांग. पुढच्या वेळेस आलो कि त्यांना जरूर भेटायला येऊ आणि परत एकदा अरुणाच्या हातचे सुग्रास भोजन करू.” तो खुश होऊन गेला.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्या चौघांना त्यांच्या प्रत्येकाच्या गुन्ह्यानुसार जी योग्य होती ती शिक्षा सांगून आम्ही घरी येण्यास निघालो.
येताना सोबत माणुसकीचा प्रचंड मोठा धडा घेऊन परतत होतो…….
सौ. वैजयंती गुप्ते.
9638393779.
Leave a Reply