नवीन लेखन...

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी दोरीच्या उड्या हा उत्तम व्यायाम आहे. उंची वाढवायची असेल, शरीराला वळणदार बनवायचे असेल, वजन कमी करावयाचे असेल तर दोरीच्या उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे.
Related image
दोरीवरच्या उडय़ा मारताना सर्वात जास्त व्यायाम होतो तो पोटऱ्यांच्या स्नायूंना. त्यामुळे दोरीच्या उडय़ांमुळे पोटरीचे आणि पायाचे पुढच्या बाजूचे स्नायू बळकट होण्यास खूपच मदत होते. जर तुम्हाला रोजच्या कामांमधून वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात. यासाठी तुम्ही घरामध्ये, एखाद्या पार्कमध्ये, किंवा कोणत्याही मोकळ्या ठिकाणी हा व्यायामप्रकार अगदी सहजपणे करू शकता.
दोरीवरच्या उड्या मारताना हात पाय आणि डोळे यामध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी हाता-पायांच्या हालचालींमध्ये योग्य प्रमाणात ट्युनिंग असणे हे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही प्रथमच हा व्यायाम करीत असाल, तर याचा सराव होण्यास तुम्हाला काही वेळ लागू शकतो. त्यामुळे सुरुवातीला केवळ पन्नास ते शंभर रीपिटीशन करावीत. हळू हळू जसा सराव वाढेल तशी ही संख्या वाढवत न्यावी. तसेच हा व्यायाम करताना सपाट जमिनीवर करावा. खडबडीत जमिनीवर हा प्रकार केल्यास तुमच्या सांध्यांवर ताण येऊ शकतो.
दोरीउड्या हा खेळाडुंसाठी एक आदर्श व्यायाम असून पायांची चपळता वाढवण्यासाठी, पायांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी, पोटर्यांचे-मांड्यांचे व नितंबांचे स्नायू सुदृढ व प्रमाणबद्ध होण्यासाठी, हातांचे स्नायू सशक्त व लवचिक होण्यासाठी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हृदयाला सक्षम करण्यासाठी व पर्यायाने तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी दोरीउड्या हा व्यायाम निश्चित उपयुक्त आहे. त्यामुळे धावपटू, टेनिस व बॅडमिंटनपटू, बॉक्सर्स, मार्शल आर्टस्चे खेळाडू यांना; किंबहुना कोणत्याही खेळामध्ये खेळाडूची क्षमता वाढवण्यासाठी दोरीउड्या हा व्यायाम उपयुक्त आहे, यात शंका नाही.
साधारण एक महिना सलग दररोज १० मिनिटे दोरीच्या उड्या मारल्या तर ते रोज ३० मिनिटे जॉगिंग करण्याइतके परिणामकारक असते. यामुळे हा व्यायाम करणाऱ्याची हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दोरीच्या उड्या मारल्यानंतर धाप लागते. याचाच अर्थ तुम्हाला जास्त कॅलरीज लागतात. ८ मिनिटं धावल्यानंतर जितक्या कॅलरीज घटतात तितक्याच कॅलरीज १० मिनिटं दोरीच्या उड्या मारल्यानंही घटतात, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
दोरीच्या उड्यांमध्ये आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होत असल्याने इतर कोणत्याही व्यायामापेक्षा हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा ठरतो. सलग ठराविक वेळ दोरीच्या उड्या मारल्यास त्याचा शरीराला अतिशय चांगला उपयोग होतो. यासाठी वयाचेही बंधन नसते.
तुम्हाला एखादा खेळ खेळायचा असेल, तर त्यासाठी धावणं, उड्या मारणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे नियमित दोरीच्या उड्या मारणं हा चांगला पर्याय आहे. दोरी उड्या मारल्याननं गुडघे, पायाचा सांधा तसंच सांध्यांमधील आधार देणारे स्नायू मजबूत होतात. यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. दोरीच्या उड्या मारल्यानं पूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. खांदे, हात, पाय, पोट, स्नायू, हृदय अशा सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो.
— संकेत रमेश प्रसादे
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..