नवीन लेखन...

स्मरणशक्ती

मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे . त्याची मेमरी दरारा बसविणारी असते . ते पुढे म्हणतात की , ऐकण्याचा मनावर होणारा परिणाम ५ सेकंदपर्यंत टिकतो . तर दृश्याचा परिणाम एक सेकंदभर टिकतो .  सकाळी फिरायला गेलो होतो रस्त्यावरच्या एका वर्कशॉपमध्ये दादा वेल्डिंगवाला वेल्डिंग करत होता .  मी म्हणालो , ‘ ओळख नाही दिलीत , विसरलात वाटतं .

त्याने क्षणभरच माझ्याकडे बघितले आणि म्हणाला ‘ आमची मेमरी स्ट्राँग हाये , विसरलो न्हाय . तुमची निळी अँम्बेसिडॉर व्हती ना एम एच . पी . ३५५२. ‘ मी थक्क झालो दादाची आठवण पाहून . अशी ही नंबर लक्षात ठेवण्याची मेमरी विशेषतः पोलिस व डिटेक्टिव्ह यांना असते .

भोजराजाच्या वेळी एकपाठी , द्विपाठी आणि त्रिपाठी असे लोक असत . कोणताही नवकवी आपली कविता दरबारात गाऊ लागला की , एकपाठी म्हणे ,  ‘मला माहीत आहे ही कविता . ‘ आणि ती तो गाऊन दाखवी .  मग द्विपाठीही म्हने , ‘ मला पण माहीत आहे . असेच त्रिपाठी पण करे . नवकवीचा उत्साहच मावळून जात असे . यावर कालिदासाने कसा मार्ग काढला . ही गोष्ट वेगळी . एवढे मात्र निश्चित की , मानवी मेंदूमध्ये कुठे तरी , कसे तरी ‘ संग्रहित ‘ केले जाते . ते नेमक्या वेळी पुढे येते . कसे ते नक्की माहित नाही .

एकदा बघितलेला माणूस आपण विसरत नाही . त्याचा आवाज , चेहरा ,स्पर्श ( झाला असल्यास ) वास म्हटले तर अतिशयोक्ति होईल , सगळेच्या सगळे , पुरे पुरे आठवणीत राहते त्यासाठी काही प्रयासही करावे लागत नाहीत . अर्थात , आठवण्याचा प्रयत्न करणे ( रिकॉल ) ही मेमरी वाढविण्याची एक पद्धत आहे यात शंकाच नाही . मेमरी नसती तर , ‘ इन मेमरी ऑफ ‘ , मेमोरिअल , स्मृतिचिन्हे स्मृति – स्मारके , जन्मदिन , स्मरणदिन पुण्यतिथी असे शब्द आलेच नसते . मग , मासिकात , वर्तमानपत्रात भरगच्च कार्यक्रम कसे छापणार ? सगळे जगच मेमरीमुळे चालले आहे .

जाहिरातकला तर संपूर्ण ‘ मेमरी ‘ वर अवलंबून आहे . या कलेचे तत्त्व काय तर , जाहिरातीतील विषय संबंधित वस्तू गि – हाइकाला विकत घेतानाच्या वेळी , नेमका पुढे आला पाहिजे . तो ब्रँड , ते स्लोगन , ते जिंगल आठवून तो म्हणाला पाहिजे व्हिडिओकॉनचे नवे मॉडेल दाखवा . सगळ्या जाहिरातींच्या मागे प्रचंड विश्वास व ताबडतोब सुख देण्याची कल्पना असते .

ईश्वराने माणसाला ‘ मेमरी ‘ ही फार मोठी ठेव दिलेली आहे . माणसे वस्तू कशा ओळखतात ? एकमेकांना कसे ओळखतात ? दृष्टीस पडल्यावर प्रतिमा जपून कशा ठेवतात ? वाचतात कसे ? भाषा कशी अवगत करतात ? नवीन माहिती स्मरणात कशी ठेवतात ? या मेंदूच्या गोष्टी जाणण्याचा डॉक्टर्सना , विशेषतः न्यूरॉलॉजिस्टसना एक छंदच असतो . आणि छंदामुळेच न्यूरोसायन्स  तयार झाले .

१८७४ सालची गोष्ट . कार्ल वेर्निके ( Carl Wernicke ) नावाचा एक जर्मन न्यूरोपॅथॉलजिस्ट होता . भाषा कळण्याकरिता मेंदूत एक जागा असते . असे त्याने शोधून काढले . ऐकलेले आणि -बघितलेले जे काही असते , त्याचा परिणाम मेंदूतील या ‘ वेर्निके ‘ क्षेत्रात होतो . जेव्हा माणसाला अर्थबोध होत नाही किंवा तो अर्थशून्य बोलतो किंवा त्याला अर्थपूर्ण वाक्ये लिहिता येत नाहीत , तेव्हा समजावे की याला ‘ वेर्निकेचा ‘ वाचाशक्तीनाश ( Wernicke’s Aphasia ) होण्याचा संभव आहे . मुख्यतः त्याला वाक्यरचना ( syntax ) करता येत नाही . मनुष्य मेमरीतूनच बोलतो . होते काय की बोलताना , वेर्निके क्षेत्रातील न्यूरल सिस्टिम्स अर्थपूर्ण शब्द निवडतात .

ते शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहेत की नाही हे ‘ ब्रोका ‘ क्षेत्रात ( Broca’s Area ) ठरते . मग ही माहिती मोटर कॉर्टेक्स ( Motor Cortex ) मध्ये जाऊन तोंड उघडले जाते , म्हणजेच शब्द फुटतात . १८६१ मध्ये फ्रेंच शस्त्रवैद्य व मानवशास्त्रज्ञ पॉल ब्रोका ( Paul Broca ) याने असे शोधून काढले की , मेंदूच्या डाव्या भागात अशी एक जागा आहे की , जेथून स्पष्ट उच्चार येऊ शकतात . जर माणसाला ब्रोकाझ अफेसिया ( Broca’s Aphasia ) झाला असेल तर तो स्पष्ट बोलू शकत नाही .

सांगायचे काय तर ‘ मेमरीचे शास्त्र ‘ साधेसुधे नाही . मेमरीच झटकन औदास्य , खिन्नता , दुर्बलता , पोकळी वगैरे निर्माण करते . तीच आपल्याला खुदकन गाली हसविते व रंजन करते . वेळच्या वेळी आठवले नाही की शरीरावर भीतीचा काटा येतो . ‘ मसल ‘ मधील एनर्जी गेल्यासारखी वाटते . ‘ मसल ‘ मधील लॅक्टिक अॅसिड ‘ कमी होऊन ‘ स्टेडी स्टेट ‘ बिघडते . तसे म्हणायचे झाले तर मेमरी सेंट्रल ‘ नर्व्हस सिस्टिम वर अवलंबून आहे . नर्व्हस इंपल्स ‘ पोहोचावा म्हणून सिनॅप्स ( synapse ) हे जंक्शन असते . तिथेच सिनॅपटिक डीले ( synaptic delay ) . अर्थात् तसा ज्ञानाचा आणि तांत्रिक शब्दांचा उपयोग नाही . न्यूरॉलॉजिस्ट्स काय करायचे ते करतील . पण , आपण पौष्टिक अन्न घ्यावे , मोकळा स्वभाव ठेवावा आणि सुखाने जगावे – म्हणजे स्मरणशक्ती शाबूत राहते .

‘अय्या ! मीठच घालायला विसरले पोह्यात , सॉरी हं ! ‘ असे तात्पुरती मेमरी गेल्याचे उद्गार आपल्याला हसवतातच ‘ विसरणे ‘ हे अगदी साहजिक आहे असे मानावे . कोणी काही मुद्दाम करत नाही .

औषधाच्या दुकानावर मी गेलो होतो आणि डोमस्टाल्ट हा शब्द आठवेना . एकदम गायब ! मग पायऱ्या उतरून येऊ लागलो , इतक्यात आठवला . मी स्वतःशीच बावळटपणे हसलो , ‘ मेमरी जाणं फार फार वाईट . ‘

कधीही विसरू नका ! फरक असतो तो गट्समध्ये , मेमरी आहे म्हणण्यात .

-सुरेश परुळेकर ,

संगमनेर .

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..