भोग प्रारब्धाचे सदा सोबती
त्याचीच, सारी सत्ता आहे
सुखद, दुःखद, वेदनांचा
दाता, त्राता स्वामीच आहे
नि:शब्दी, सारेच भोगावे
तेव्हडे आपुल्या हाती आहे
कधी सुखाचा माहोल सारा
कधी दुःखाची साऊली आहे
कधी, क्षण असह्य वेदनांचे
मनांतरासी, छळणारे आहे
उमजुनीया, सदा सावरावे
हेच खरे मानवी जीवन आहे
सदा,शरण जावे दयाघनाला
तोच, केवळ तारणारा आहे
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६१
२८ – २ – २०२२.
Leave a Reply