एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,–!!!
सोडून आले आहे मी सगळे,
आपल्यात घडलेले सारे,
माझे तुझे सारे किस्से,
खरंच मी सोडून आले,
रडले डोळे माझे,
अगदी हमसाहमशी,
तुझ्याच फक्त घरापाशी,
सोडून आले सगळे,
रुसणं, रागावणं, मनवणं
मुद्दाम जिद्दीने भेटणं,
अशा कित्येक स्मृती,
सोडून आले तुझ्या दाराशी,-!!!
एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले,
अशा सगळ्या रात्री,
सोडल्या तुझ्या दाराशी, –!!!!
अगदी अगदी बेवारशी,
जिथे सुखाचे आभाळ,
येऊन सामावत होते,
तिथे त्याला पेलणारे ,
हातच मी सोडून आले,
तुझ्या दाराशी बेवांरशी,—!!!!
त्यात काही विजाही,
येऊन भेटायच्या मला,
त्यावेळी होणारी सुखाची बरसात, सोडून आले मी तुझ्या दाराशी,–!!
मिलनाच्या वाटेवरच,
विरहाचे होते चटके,
एका अनामिक भितीने,
आसुसलेपण त्या प्रेमातले,
सोडून आले तुझ्या दाराशी,–!!!
तुझ्या दाराशी,—!!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply