नवीन लेखन...

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे.

गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते. आज ज्युनिअर सोनालीचा वाढदिवस. तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी खडकी पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे.

तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.

स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुख च्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे ‘सोशल मीडिया’वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..