सोनं येचीतो मातीतं….
सोनं येचतो मातीतं…
संगणीच्या संगतीतं…
मोती घामाचे पिकवितो…
काळी मायच्या कुशीतं….
पशु पक्षी वृक्षवल्ली
काळ्या मायची लेकरं
सार तिच गणगोतं
तिलं सृष्टीचा संसारं….
पिकं शेतात डोलते
पाना फुलांनी सजते
फुले काळीज बळीचं
मनं हारखुन जाते…..
मका पोटुशी पोटुशी…
डोकं जवारी काढते…
गहु मिशांना ताविते…
फुलं सुर्याच डोलते…
पक्षी झाडाशी बोलती,
गाय गोठ्यात हंबरी,
मह्या शेतातली शाळा,
मलं ईथच पंढरी……..!!!
©गोडाती बबनराव काळे
लातुर
९४०५८०७०७९
Leave a Reply