१९९४ च्या सुरवातीला कसलाच आसभास नसताना, अचानक दक्षिण आफ्रिकेतील नोकरीसाठी मुलाखतीचे आमंत्रण मिळाले. मुलाखत फेब्रुवारीत झाली आणि नोकरी पक्की झाली.
तोपर्यंत दक्षिण आफ्रिका म्हणजे नेल्सन मंडेला ही व्यक्ती तसेच, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केप टाउन या शहरांची नावे, इतपतच माहिती होती. माझी नोकरी पिटरमेरीट्झबर्ग शहरात होती. हे शहर कुठे आहे, याबाबत संपूर्ण अनभिज्ञ होतो.
तरी देखील काही ओळखीच्यांकडून देशाचे कौतूक ऐकले होते. युरोपच्या धर्तीवर देश आहे, असे ऐकायला मिळाले. जुनमध्ये रीतसर व्हिसा आणि विमानाचे तिकीट मिळाले आणि सामानाची बांधाबांध सुरू झाली. एयर इंडियाचे विमान आणि सरळ डर्बन विमानतळावर उतरायचे!!
सांगायची बाब अशी, इतकी कोरी पाटी घेऊन मी देशात नोकरी करायला निघालो होतो.
तोपर्यंत तरी नवीन देश आहे, ४,५ वर्षे काढून बघू, हाच विचार केला होता पण प्रत्यक्षात १७ वर्षे काढली. नोकरीनिमीत्ताने काही शहरांत वास्तव्य झाले. सुख समृद्धीचे दर्शन तर घडलेच परंतू त्यामागील दयनीय अशा दारिद्र्याचे दर्शन देखील घडले.
— अनिल गोविलकर
Leave a Reply