नवीन लेखन...

साउथ आफ्रिका – भाग ५

कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात. त्यांना, त्यांच्या गोऱ्या कातडीचा कमालीचा अभिमान असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जगात आपल्या गोऱ्या कातडीला किंमत आहे आणि त्याची त्यांना प्रखर जाणीव असते, अगदी रस्त्यावरील भिकारी जरी घेतला तरी तो भीक मागताना जरा गुर्मीतच भीक मागत असतो.

मी, जेंव्हा, पाच वर्षापूर्वी UB group join केला होता, तेंव्हा माझी काही गोऱ्या कुटुंबांशी चांगली ओळख झाली. अर्थात, रस्टनबर्ग येथील कंपनीत, तीन,चार गोऱ्या मुली सडल्या तर, बाकी बहुतेक काळे अथवा भारतीय वंशाचेच लोक कामाला होते. माझी नोकरी, Standerton नावाच्या एका आडगावी होती, कारण बृवरी तिथली. अर्थात. आडगाव जरी झाले तरी, बहुतेक नागरी सुविधेत कसलीही कमतरता आढळत नाही. फक्त, प्रचंड मॉल्स, कॅसिनोस वगैरे चैनीच्या गोष्टींची वानवा असते. बाकी, खाण्या पिण्याचे किंवा राहण्याचे कसलेही हाल होत नाहीत. पब्स, हॉटेल्स क्लब्स वगैरे गोष्टी गावागावात असतात. असो, तशी बृवरी लहानच होती(आता ती बंदच झाली- धंदा नाही!!) पण, त्या ऑफिसमध्ये मात्र बरेच गोरे लोक कामाला असल्याने, मी त्याच्या जवळ जाऊ शकलो. माझा Brewery Vice President गोरा होता तर माझ्या फायनान्स विभागात तर, माझा Accountant आणि इतर स्नेही बरेचसे गोरेच होते. मार्केटिंगमध्ये तोच प्रकार होता. अर्थात, एकत्र काम करत असल्याने आणि एकूणच गाव तसे फारच आडनिड्या जागी आणि लहान असल्याने, ओळख भराभर वाढत गेली. अजूनही, दोन  लोकांशी संबंध आहेत. तिथे खऱ्याअर्थाने  मी गोरा माणूस अनुभवला. तसे गाव लहान असले तरी, गावात चर्च होते. त्यानिमित्ताने, मी चर्च आतून, बाहेरून व्यवस्थित न्याहाळले.
एकदा, तर माझ्या Accountant च्या लग्नाच्या निमित्ताने, सगळा सोहळा देखील अनुभवला. त्याचे ते तिसरे लग्न होते आणि नुकतेच त्याने चौथे लग्न केल्याचे समजले!! मागे मी म्हटले तसे, गोरे लोक, सर्वसाधारणपणे कामात सचोटी दाखवतात, हा जो आपला समज आहे, त्याला संपूर्ण छेद देणाऱ्या घटना, माझ्या काळात घडलेल्या आहेत. चक्क, पैसे खाण्याच्या आरोपावरून, मला दोघांना कामावरून काढावे लागले. अर्थात, भ्रष्टाचारात फक्त काळे किंवा भारतीयच आघाडीवर असतात, असे म्हणायची अजिबात गरज नाही.
संधी मिळाली तर, गोरे देखील पैसे खाण्याच्या बाबतीत मागे राहत नाहीत!! पण, तसे प्रमाण मला तरी कमीच आढळले. काळ्याच्या पैसे खाण्याला मात्र तोड नाही. गोरे मात्र बोलण्यात सडेतोड असतात व याचे मुख्य कारण म्हणजे, निदान इथे तरी, आजही, गोरी कातडी असेल तर त्याला आपणहून मान दिला जातो, मग ते गुर्मीत वागणार नाही तर काय!! मला याचा सुरवातीला थोडा त्रास झाला पण लवकरच मी त्यांचे पाणी जोखले आणि स्थिरावलो. नंतर मात्र, मला फारसा त्रास झाला नाही.
एकूणच गोरी माणसे हीं आपल्याच विश्वात वावरणारी असतात. तुम्ही कितीही ओळख दाखवा, जर का तुमच्या हाताखाली गोरा काम असेल तर तो तुमच्याशी योग्य त्या मानाने वागेल पण, कामाची वेळ झाली की, पूर्ण वेगळा असतो. तुम्ही त्यांच्या समाजात संपूर्णपणे स्वीकारले जात नाही, हीं वस्तुस्थिती आहे. ऑफिसमध्ये, तुमच्याशी अति सलगीने गोऱ्या वागतील पण त्यांचा so called professional approach असतो. त्यांच्या घरात जरी तुम्ही गेलात तरी एका विशिष्ठ मर्यादेपर्यंतच ते तुमच्याशी मोकळेपणाने वागतील. तुमच्याबरोबर अगदी डान्स देखील करतील, ड्रिंक्स घेतील, गप्पा गोष्टी विनोद करतील पण, त्या सगळ्यांना एक मर्यादा आखून घेतलेली असते. इथे शक्यतो, गोरे आणि भारतीय, यांच्यात फारसे लग्न संबंध आढळत नाहीत. फार क्वचित असे संबंध जुळून येतात. तसेच, काळे आणि गोरे देखील फारसे एकत्र येत नाहीत. अर्थात, लैंगिक संबंध म्हणशील तर, तिथे कसलाच विधिनिषेध नसतो!! तुमच्याबरोबर हॉटेलमध्ये गोरे लोक अगदी जेवायला देखील येतील(पैसे मात्र contribution च्या स्वरुपात आग्रहाने देतील!!) अगदीच जवळीक झाली तर, चक्क क्लबमध्येदेखील येतील पण, कायमचे संबंध म्हटले की शक्यतो गोराच साथीदार निवडतील. मला वाटते, हा दोन संस्कृतीतील फरक आहे. गोरे लोक हे अतिशय वास्तववादी असतात. उगाच भावनांना वाजवीपेक्षा जास्त महत्व देत नाहीत. जिथे पैसा आहे आणि आयुष्य स्थिर होण्याची शक्यता दिसते, तिथे त्यांना संबंध जुळवण्यात फारशी आडकाठी येत नाही.
तसेच, एकूणच, लग्न संबंध त्या समाजात फारच लवचिक स्वरुपात आढळतात, अर्थात, तो रोग आता भारतीय समाजातदेखील फार झपाट्याने पसरलेला आहे. मी बघितलेले  जे गोरे लोक आहेत, त्यांच्यातील फारच थोडे वगळता, बहुतेक सगळे जण, विवाहबाह्य संबंध ठेवणारे आहेत. यात, मुली, बायका देखील आल्या. त्यात, त्यांना कसलीच क्षिती वाटत नाही. मी काही वेळा काही गोऱ्या लोकांच्या घरी, ख्रिसमस निमित्ताने किवा गुड फ्रायडे निमित्ताने गेलो आहे. पण, एकूणच मला आजही असे म्हणवत नाही की, माझ्या माहितीतले गोरे लोक, माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. शेवटी, वागण्या बोलण्यात थोडासा तरी तीढेपणा येतोच येतो. त्यातून, बरेच गोरे लोक फार formal असतात. त्यांना, त्यांच्या ऑफिस कामाच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी, कुणी भेटलेले किंवा संबंध ठेवलेले फारसे पचनी पडत नाही.
अगदी, ऑफिसची ख्रिसमसची पार्टी जरी असली तरी, ना ना तऱ्हेची बयाणे उभी करतील आणि त्या कार्यक्रमातून सुटका करून घेतील. त्यांचा खाजगी वेळ मात्र, त्याचाच राहील, याची ते सर्वतोपरी दक्षता घेतील. एकूणच, स्वत:भोवती कुंपण घालून घेतल्याप्रमाणे राहतील. ते तुमच्या आयुष्यात कधीही डोकावणार नाहीत, अगदी तुम्ही परवानगी देलीत तरी!! आपण बरे आणि आपले आयुष्य बरे, असा थोडा एकलकोंडा स्वभाव आढळतो. त्यामुळे, जरी तुमच्या शेजारी एखादे गोरे कुटुंब राहत असले तरी, तुमच्याशी त्यांचा फक्त, Hi, Hello, Good Morning, Good Night, इत्यादी शब्दांनीच शक्यतो बोळवण होते.
अर्थात, पार्टी रंगवावी तर त्यांनीच!! मी अशा कितीतरी पार्ट्या आतापर्यंत अटेंड केल्या आहेत. सतत, काहीना ना काही तरी विनोद करणार, मग तो अति अश्लील देखील असतो आणि तो देखील सगळ्या मुली/ बायकांच्या समोर!! खर तर, अश्लील(आपल्या मते- त्यांच्या मते, अगदी गमतीशीर बोलणे!!) बोलण्यात, त्यांचा हात कुणी धरणार नाही. अगदी, मुली देखील काही कमी नसतात. एकतर वागायला(पार्टीच्या वेळेस!!)
अति मोकळ्या-ढाकळ्या, कपडे देखील तसेच आणि अंगावर अप्रतिम सेंट फवारलेला. त्यामुळे, एकूणच वातावरण अति रम्य होते, यात शंकाच नाही. मग, त्या तुमच्या बरोबर डान्स काय करतील, स्मोकिंग तर सतत चालूच असते आणि त्याच बरोबरीने ड्रिंक्स!! अरे, मुलींची पिण्याची कुवत थक्क करणारी असते, अगदी, पाच, सहा पेग्ज(Double pegs!!) झाले तरी जरा पाय इकडचा तिकडे होणार नाही!! रात्रभर पार्टीचा  दंगा चाललेला असतो.
अर्थात, एकदा का पार्टी संपली की मात्र, तुम्ही वेगळे की आम्ही वेगळे. अर्थात, जर का तुमचे तसेच जवळकीचे संबंध असले तर मात्र ताटातूट नाही!! असा हा गमतीशीर गोरा समाज आहे.  कामाच्या बाबतीत मात्र, मी आजही गोराच माणूस पसंद करतो कारण, निदानपक्षी तो दिलोएले काम त्याच्या पूर्ण वकुबाने करील. भारतीय माणूस म्हणजे एक डोकेदुखीचा असते. अपवाद वगळता, मला भेटलेले सगळे भारतीय, एकतर कामचुकार तरी आहेत किंवा अति शहाणे तरी आहेत!! भारतीयांना असेच वाटते की, मी काम करतो म्हणून कंपनी चालते!!
प्रत्येक कामात शेकडो चुका आणि त्याच तपासणे, हीं आपली डोकेदुखी ठरते. काळा माणूस तर बिनडोक असतो,, त्यामुळे त्याला काम द्यायचे तेंव्हा निदान आपली मानसिक तयारी असते की, आपल्या तेच काम परत तपासायला लागणार आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या काळात, मला आजमितीस, फक्त तीनच काळे असे भेटले की, त्यांच्या कडून मी काहीतरी चांगले शिकलो. अगदी, Earnst Young, Price Waterhouse, Delloit यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या जरी घेतल्या तरी, कल्याणच्या बाबतीत असाच अनुभव येतो आणि अर्थात, भारतीय वंशाचे लोकदेखील फारसे अपवाद नव्हेत.
-अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..