जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला.
जेमिनी गणेशन यांनी १९५७ साली ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी ‘देवता’, ‘राज तिलक’, ‘नजराना’ या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा. रेखाशिवाय जेमिनी यांना एकुण सात मुले व मुली आहेत. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.
जेमिनी गणेशन यांच्या आयुष्यात चार स्त्रिया आल्या होत्या. १९४० मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न अलामेलूसोबत झाले होते. असे म्हटले जाते, की अलामेलू या त्यांच्या एकमेव कायदेशीररित्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांचे अभिनेत्री पुष्पावल्ली, सावित्री आणि जुलियाना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. बातम्यांनुसार, जुलियाना त्यांच्यापेक्षा वयाने ३६ वर्षे लहान होती. पहिली पत्नी अलामेलू यांच्यापासून जेमिनी यांना चार मुलगी झाल्या. रेवती, कमला, जयलक्ष्मी या तीन मुली डॉक्टर आहेत, तर नारायणी ही मुलगी पत्रकार आहे. पुष्पावल्ली यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या, त्यापैकी रेखा ही अभिनेत्री आहेत, तर राधा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. दुसरी पत्नी सावित्रीपासून जेमिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी विजया चामुंडेश्वरी फिजिओथेरपिस्ट असून मुलगा सतीश कुमार परदेशात स्थायिक झाला आहे.
जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply