दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा जन्म ७ नोव्हेंबर १९८१ रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे झाला.
अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. अनुष्का शेट्टीने कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने बंगळूरुच्या माऊंट कार्मेल कॉलेजमधून बीसीए पूर्ण केले आहे.
अनुष्का शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात योगा इंस्ट्रक्टर म्हणून केली होती. त्यानंतर तिचा कल अभिनयाकडे वाढला. ‘सुपर’ या तेलगू सिनेमातून अनुष्काने २००५ मध्ये दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण केले. हळू-हळू तिला यश मिळत गेले आणि सिनेमांच्या ऑफर्स मिळायला लागल्या. अनुष्काने आतापर्यंत ‘विक्रमार्कुदु’, ‘अरुन्धति’, ‘वेदम’, ‘बाहुबली’ सिंघम-२ ,सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे. तशी साऊथ सिनेमातील हिरोईन्सना फि कमी मिळते. पण अनुष्काबाबत तसं नाहीये. अनुष्का ही एका सिनेमासाठी तब्बल चार कोटी रूपये घेते. ‘बाहुबली २’ या सिनेमासाठी अनुष्काने तब्बल ५ कोटी घेतल्याची माहिती आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply