नवीन लेखन...

स्पेस टुरिझम

चला या वर्षी कुठे तरी लांब फिरायला जाऊ असं म्हणत आपण एक छान प्लॅन बनवतो आणि निघतो फिरायला. तसंच काहीसं फिरायला जायचं दूर अवकाशात. विमानातून फिरताना कसे ढग हातात घ्यावेसे वाटतात तसाच अवकाशात फिरताना कदाचित तारे हातात घ्यावेसे वाटतील. किंवा चंद्रावर उतरून हरणाची जोडी बघता येईल.

अंतराळ पर्यटन म्हणजे गंमत म्हणून अंतराळ प्रवास. ऑर्बिटल, सबोर्बिटल आणि चंद्र स्पेस टूरिझम यासह अंतराळ पर्यटनाचे बरेच प्रकार संशोधकांच्या आणि यात काम करणाऱ्या कंपन्यांच्या डोक्यात आहेत. गेल्या काही वर्षात अवकाशात एक चक्कर मारणे शक्य झाले आहे. एका रशियन अवकाश एजन्सीने हे शक्य केले आहे. जगात फक्त ७ माणसांनी हे पर्यटन केले आहे आणि त्यासाठी थोडे थोडके नाही तर अब्जावधी डॉलर्स मोजले आहेत. अवकाश पर्यटन वाहने विकसित करण्याच्या साठी ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन गॅलॅक्टिक सारख्या एरोस्पेस कंपन्या काम करतायत. स्पेसएक्सने ( एक एरोस्पेस उत्पादक) २०१० मध्ये घोषित केले की ते स्टार्शिपवरील चंद्राभोवती तुम्हाला चक्कर मारवून आणणार आहेत. तरी सुद्धा या गप्पाच आहेत. २००१ ते २००७ पर्यंत एकूण ७ जणांनी ८ वेळा अवकाश टूर केली आहे यासाठी या सगळ्यांनी प्रत्येकी किंमत २० – २५ दशलक्ष डॉलर्स मोजले असावेत असा अंदाज आहे. २०२१ पर्यंत अवकाश पर्यटनाची बाजार पेठ खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित होईल असा पर्यटन क्षेत्रांतील संशोधकांचा अंदाज आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल स्पेस एजन्सी आणि रॉकेट आणि स्पेस कॉर्पोरेशन एनर्जिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस अॅडव्हेंचरने जगातील सर्वप्रथम खासगी अवकाश एक्सप्लोररसाठी उड्डाण सुलभ केले. पहिल्या तीन सहभागींनी आयएसएसला १० दिवसाच्या भेटीसाठी प्रत्येकी २० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम दिली आहे.

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या क्रू (Crew) च्या आकारात वाढ झाल्यामुळे रशियाने ऑर्बिटल स्पेस टूरिझम थांबविला होता.

७ जून, २०१९ रोजी, नासाने जाहीर केले की २०२० पासून, खासगी अंतराळवीरांना स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन अवकाशयान आणि सार्वजनिक अंतराळवीरांसाठी बोईंगचे स्टारलाईन अंतराळ यान वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्याची परवानगी देण्यात येईल.

एका अंतराळवीरांसाठी दररोज ३५,००० डॉलर्सची किंमत असणार आहे. (म्हणजे ३५०००० डॉलर्स १० दिवसांसाठी) डॉलरचे कनवर्जन करण्याच्या फंदात नका पडू. छाती दडपून जाईल.

अमेरिकास्थित एका कंपनीने आपला स्पेस प्रोग्राम जाहीर केला आहे. त्यांचा पहिला प्रयोग अयशस्वी झाला तरी सुद्धा जगभरातून सुमारे ७०० लोकांनी आगाऊ पैसे भरले आहेत. सध्यातरी एवढंच आपण विचार करू शकतो, कोकणात दापोली सारख्या ठिकाणी मस्त घर बांधून फेसाळणाच्या समुद्राच्या साक्षीने तिचा हात हातात घेऊन चंद्राच्या प्रकाशात तारे मोजूया.

–मकरंद मराठे

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..