स्त्रीचे जास्त वय (३० च्या पुढे), वाढलेला रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, पूर्वी झालेले गर्भपात, मधुमेही स्त्री, आधीचा मृत गर्भ, अगर पूर्वी बाळ जन्मल्यावर थोड्याच वेळात मृत झाल्यास, जन्मतः बाळाचे वजन फारच कमी (दोन किलोपेक्षा कमी) पोटात जुळे गर्भ, आधीचे सिझेरिअन असेल अगर आता करण्याची शक्यता असेल, पाणमोट बरेच दिवस आधी फुटल्यास, अपेक्षित तारखेपेक्षा जास्त दिवस वर गेल्यास, मातेचा रक्तगट आरएच निगेटिव्ह असल्यास, गर्भवतीच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण खूप कमी- इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊनच डॉक्टर योग्य ती चाचणी करण्याचा सल्ला देतात.
आता पोटातील गर्भात काही व्यंग नाहीना हे चाचण्या केल्याने कळते. सोनोग्राफी- टी. व्ही.चा तपास- अतिसूक्ष्म ध्वनीलहरींनी हा तपास होतो. त्यापासून अजिबात तोटा होत नाही. फायदे मात्र भरपूर आहेत. बाळाची वारेची माहिती मिळते. मुलगा की मुलगी हे पाहण्याचा उद्देश नसतो. तो गुन्हाही आहे. वारजनित पेशी आणि गर्भजल चिकित्सा फार थोड्यांना कराव्या लागतात. गर्भाची गुणसूत्रे अभ्यासण्यासाठी उपयोग होतो. एन. एस. टी.च्या तपासात बाळाच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळते. बाळ सुदृढ, निरोगी असावे हीच मातेची इच्छा, डॉक्टरांची अपेक्षा आणि नव्या नव्या शोधांची जननी.
आपण सर्व जण मातेच्या पोटात नऊ महिने राहिलो ते आपले घर म्हणजे मातेचे गर्भाशय ! संपूर्ण स्नायूंनी बनलेले गर्भाशय दोन महत्त्वाची कार्ये करते. एक म्हणजे बाळाला नऊ महिने सांभाळून ठेवते व त्याचे जतन करते, पालनपोषण करते आणि नऊ महिने पूर्ण झाले म्हणजे आकुंचन पावून बाळाला बाहेर येण्यास मदत करते मग होतो बाळाचा जन्म! प्रसूती अवस्था- ही क्रिया तीन अवस्थांमध्ये होते. पहिल्या अवस्थेत प्रत्येक कलेबरोबर गर्भाशयाचे तोंड
हळूहळू उघडते. बंद असलेले कुतूहल १० गर्भाशय मुख पूर्ण उघडण्यास १० सें. मी. करणीला ८ ते १० तास लागतात. बहुप्रसवेत ६-७ तासांत पहिली अवस्था संपते.
दुसऱ्या अवस्थेत बाळ हळूहळू योनीत प्रवेश करते आणि बाहेर येते. बाळाचा जन्म होतो- दुसरी अवस्था पूर्ण होऊन तिसरी अवस्था सुरू होते. दुसऱ्या अवस्थेचा काळ अर्धा ते एक तासांचा असतो. तिसऱ्या अवस्थेत वार पडते. यानंतर २ तास प्रसवेला देखरेखीखाली ठेवले जाते. याला चौथी अवस्था म्हणतात.
-डॉ. मन्दाकिनी पुरंदरे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply