मित्रांनो आज बुधवार!
या ‘वारा’चा माझा ज्योतिषशास्त्रीय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना अंधश्रद्धा वगैरे वाटेल त्यांनी याकडे केवळ गंम्मत म्हणून पाहावे ही नम्र विनंती.
आमच्या ज्योतिषशास्त्रात ‘बुधवार’ रिपीटेशन साठी प्रसिद्ध आहे.
म्हणजे काय?
तर, आपल्या नेहेमीच्या ‘रुटीन गोष्टीं’पेक्षा एखादी ‘वेगळी’ गोष्ट जर आपणं बुधवारी केली तर तीच किंवा तशीच एखादी गोष्ट त्याच दिवशी वा पुढील काही दिवसांत घडते.
उदा. जर आपली गाडी एखाद्या बुधवारी रस्त्यात पंक्चर झाली तर ती पुन्हा पंक्चर होते किंवा एखाद्या कामास आपण बुधवारी सुरूवात केली की ते काम पुर्ण न होता परत सुरू करावे लागते.
म्हणून कदाचीत आमच्या गांवाकडे एखाद्या घरी मृत्यू झाल्यास त्या घरी ‘पाचारण्या’साठी किंवा ‘हाक’ मारण्यास बुधवारी जाऊ नये असे म्हणतात. बुधवारी लग्नदेखील करू नये असा समज आहे. कारण हेच, की तिथे पुन्हा त्याच कारणांसाठी जावे लागते..!!
फार सिरीयसली घेऊ नका पणं ऑॅब्झर्व नक्की करा..
– गणेश साळुंखे
Leave a Reply