निराकार तो असूनी व्यापतो,
सर्व विश्व मंडळ,
सूक्ष्मपणातही दिसून येतो,
करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।
दर्शन देण्यास भक्त जणांना,
धारण करितो रूप,
तसाच दिसे नयनी तुमच्या,
ध्यास लागता खूप ।।२।।
दृष्टांत होणे सत्य घटना ती,
जीवनी तुमच्या घडे,
वेड लागता प्रभू चरणाचे,
सदैव स्वप्न पडे ।।३।।
कुणामध्येही अस्तित्व दाखवी,
हीच त्याची किमया,
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,
दृष्टांताची ही माया ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply