नवीन लेखन...

क्रीडा दिन

आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलींगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा.

ध्यानसिंग सोमेश्वरसिंह बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. १९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ – १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते.

हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकला. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले. १९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी जर्मनीचा हुकूमशहा अॅनडाल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता.

ध्यानचंद आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे ३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले. हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on क्रीडा दिन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..