२१ जून हा कर्क संक्रमणाचा दिवस खगोलशास्त्राप्रमाणं उन्हाळ्याची, उत्तर गोलार्धातली सुरवात मानण्यात येते. आज २१ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटांनी सूर्य खगोलीय विषववृत्तावर येईल. यालाच “वसंत संपात” (इंग्रजीत March equinox,spring equinox, किंवा Vernal equinox) असे म्हणतात.
त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. २३.५° उत्तर अक्षांशापर्यंत जाऊन दि. २१ जूनला त्याचा परत दक्षिणेकडील प्रवास सुरू होतो.(दक्षिणायन प्रारंभ) दि. २३ सप्टेंबरला तो पुन्हा विषववृत्तावर येतो , यालाच “शरद संपात” म्हणतात.इंग्रजीत Autumn equinox, September equinox असे म्हणतात.
खगोलशास्त्रानुसार उत्तर गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात २१ मार्चपासून समजण्यात येते. मात्र, मोसम विज्ञानानुसार उत्तर गोलार्धात त्याचा कालखंड जून, जुलै, ऑगस्ट असा मानण्यात येतो. त्यामुळं खगोलशास्त्रानुसार भारतात २१ जून हा ऋतुमध्ये दिवस असतो. २१ मार्च रोजी सूर्य जिथं असतो, त्या स्थितीला “वसंत संपात’ आणि २१ सप्टेंबर रोजी तो जिथं असतो, त्यास “शरद संपात’ म्हणतात. या दोन्ही दिवसांना विषुवदिन (इक्विनॉक्सअ) असं संबोधलं जातं.
२१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडं जाऊ लागतो. २१ डिसेंबर या दिवशी तो त्याच्या दक्षिणतम मर्यादेपर्यंत म्हणजे मकरवृत्तावर येतो आणि त्यानंतर त्याचं पुन्हा एकदा उत्तरेकडं भ्रमण चालू होतं (उत्तरायण). भारतात या चक्राची विभागणी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंत केलेली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply