मुथय्या मुरलीथरन याचा जन्म १७ एप्रिल १९७२ रोजी सिलोनमधील कॅंडी येथे झाला. मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. त्यांच्या वडिलांचा बिस्किटचा बनवण्याचा व्यवसाय उत्तम चालेल होता. मुरलीभाईचे आजोबा १९२० मध्ये श्री लंकेत आले होते. मुर्लीथरां ९ वर्षाचा असताना कॅंडीमधील खाजगी शाळेत जाऊ लागला. सुरवातीला तो मिडीयम पेस गोलंदाज होता परंतु शाळेमधील त्याचे कोच सुनील फर्नांडो यांनी त्याला ऑफ स्पिन करायला सांगितले तेव्हा तो १४ वर्षाचा होता. त्यावेळी तो ऑल राऊंडर म्हणून खेळत असे आणि फलंदाजीला मधल्या फळीमध्ये खेळण्यास येत असे.
शाळेमधील शिक्षण संपल्यावर मुरळीथरणाने तामिळ युनिअन क्रिकेट अँड अँथेलेटिक क्लब मधून खेळू लागला आणि पुढे १९९१ मध्ये श्रीलंकेच्या ‘ अ ‘ टीमसाठी इंग्लंडला खेळण्यास गेला. त्याने तिथे पाच सामने खेळले परंतु त्याला अपयश आले. कारण त्याला एकही विकेट मिळाली नाही. परत येताना तो अॅलन बॉर्डरच्या संघाच्या सराव सामन्यामुळे तो प्रभावित झाला. त्यानंतर तो पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रेमदासा स्टेडियम वर खेळला तो २८ ऑगस्ट १९९२ रोजी .
त्याचे आजोबा १०४ वर्षाचे असताना वारले तेव्हा तो भारतात खेळत होता त्यांच्या अंत्यविधीसाठी तो परत श्रीलंकेला गेला. त्यावेळी त्याने सर्वात जास्त कसोटी समान्यांमधील विकेट्स घेऊन कॉटनी वॉल्श चा रेकॉर्ड मोडलाहोता . हा रेकॉर्ड मोडलेला बघण्याची त्याच्या आजोबांची इच्छा होती ती मात्र त्याने पुरी केली होती. त्यांचे कुटूंब अत्यंत ट्रॅडिशनल होते. त्याचे कुटूंब हे मूळचे भारतामधील होते.
मुरलीथरनच्या नावावर अनेक रेकॉर्डस् आहेत . त्यापैकी महत्वाचा तो म्हणजे त्याने एका इनिंगमध्ये ७ विकेट्स प्रत्येक कसोटी सामने खेळणाऱ्या देशाच्या संघाच्या घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने दोनदा ९ विकेट्स कसोटी इनिंगमध्ये घेतल्या आहेत. तर ११ वेळा मॅन ऑफ सिरीज अवॉर्ड त्याला मिळाले आहे. तर १९ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाले आहे .तर जॅक कॅलिसला ते २३ वेळा मिळाले आहे.
मुरलीथरन याने पहिली कसोटी विकेट क्रेग मॅकडरमॉटची घेतली तो त्यावेळी पायचीत होता तर ८०० वी विकेट प्रग्यान ओझाची घेतली होती. त्याने कॉटनी वॉल्शचा ५२० विकेट्सचा रेकॉर्ड मोडला तर शेन वॉर्नचा ७०९ विकेट्सचा रेकॉर्ड मोडला.
मुरलीथेरन १२ ऑगस्ट १९९३ रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळाला तो भारताविरुद्ध ,त्यावेळी त्याने दहा षटकांमध्ये ३८ धावा देऊन पहिला खेळाडू बाद केला त्याचे नाव होते प्रवीण आमरे .
२३ ऑक्टोबर २००० मध्ये त्याने शारजाला भारतविरुद्ध खेळताना ३० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. ही त्याची एकदिवसीय सामन्यामधील सर्वोतकृष्ट कामगिरी होती. मुरलीथरनने ५ वर्ल्ड कप खेळले असून त्यामध्ये त्याने ऐकून ६७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आधी क्रमांक लागतो तो ग्लेन मॅग्रा याचा त्याने ७१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याचा एक वेगळा रेकॉर्ड आहे तो म्हणजे जास्तीत जास्त ५९ वेळा तो शून्यावर बाद झालेला आहे. त्याने कसोटी सामन्यांमध्ये जास्तीत जास्त ४४, ०४३ चेंडू टाकले आहेत. स्वतःच्या होम ग्राऊंडवर खेळताना त्याने जास्तीतजास्त म्हणजे ४९३ विकेट्स घेतल्या आहेत.
मुर्लीथरां बद्दल लिहावयाचे म्हटली तर त्याची गोलंदाजी खूप वेगळी होतीच परंतु अनेक वेळा त्याच्यावर आक्षेपही घेतले . अँडम गिलख्रिस्ट ह्याने त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्याच्या गोलंदाजीच्या अँक्शन वर आक्षेप घेतला आहे आणि असे म्हटले आहे की त्याची रेकॉर्ड ब्रेकिंग करीअर ही वादातीत होती. त्याची गोलनंदजीची अँक्शन नेहमीच वादात राहिली आहे. क्रिकेट पंच डेरेल हेअर याने त्याला त्याबद्दल सात वेळा नो-बॉल दिले होते . परंतु कितीही झाले तरी क्रिकेटमध्ये आकडे हे बोलतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले.
३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २३.०८ च्या सरासरीने ५३४ खेळाडू बाद केले. तर २३२ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये १, ३७४ खेळाडू बाद केलेले १९ .६४ या सरासरीने. त्याने ११९ वेळा एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू बाद केले तर ३४ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. तर एका इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले.
मुरालीथरनच्या नावावर अजून खूप रेकॉर्डस् आहेत ..
— सतीश चाफेकर
Leave a Reply