दरवळता , भक्तीभाव अंतरी..
देवत्वाचा साक्षात्कार व्हावा..
बीजांकुर , सृजनाचा रुजता..
जीवनाचा गर्भितार्थ कळावा..।।१।।
शब्दांशब्दांमधुनी रंग हसावा..
श्वासाश्वासातूनी , तो गंधावा..
सुखदुःखाच्या आसवातुनही..
मंजुळ वेणूचा आनंद लुटावा..।।२।।
रानफुलातुनही भ्रमर गुंतता..
मंद प्रीतीचीच झुळूक यावी..
पर्णापर्णातुनी फुटता पालवी..
मम हृदयी आत्माराम हसावा..।।३।।
शब्द अबोली अन गहीवरता..
गंधचंदनी मना स्पर्शूनी जावा..
तृषार्थ व्हावे या अशा जीवनी..
आत्मरंगी आत्माराम भुलावा..।।४।।
वि.ग.सातपुते.(भावकवी.)
9766544908
रचना क्र. ६३
१२ – ५ – २०२१
Leave a Reply