पहिल्या अवस्थेच्या सुरुवातीला पाय जड होतात, कंबर दुखते, पोटात कळा येऊ १२ आठव लागतात. हळूहळू कळ जास्त वेळ राहते, दोन कळांमधले अंतर कमी होऊ लागते. दहा मिनिटांमध्ये २-३ कळा येत असतील तर प्रसूती समाधानकारक आहे, असे समजावे. कळ आलेली असताना मातेने दीर्घ श्वास घ्यायचा. सर्व अंग सैल सोडायचे. दोन कळांच्या मधल्या वेळात स्वस्थ पडून राहायचे.
सर्व शरीर मोकळे सोडून पुढची कळ सोसण्यास मनाची तयारी करावी. शरीर सैल सोडल्याने बाळाला रक्त आणि प्राणवायू मिळणार मग बाळ गुदमरत नाही. कळा फार तीव्र नसल्यास खोलीत फिरायला हरकत नाही. कळ आली, की बसायचे. पाणमोट फुटल्यावर चालायचे नाही. प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेत कळ आल्यावर मातेने खाली जोर करून बाळ पुढे ढकलायला मदत करायची. कळ गेल्यावर लांब श्वास आणि शरीर सैल सोडणे. पहिल्या अवस्थेत जोर करायचा नाही. प्रसूतीच्या काळात मातेची नाडी, रक्तदाब आणि बाळाच्या हृदयाचे ठोके याकडे सतत लक्ष ठेवले जाते, बाळाचे डोके पुढे सरकते आहे याकडे पण नजर असते डॉक्टरांची. डोके अगदी बाहेर येण्याच्या वेळी योनी द्वारास छेद देऊन ते मोठे करतात.
प्रसूतीनंतर टाके घालून ते पूर्ववत केले जाते. तिसऱ्या अवस्थेत मातेने पुन्हा स्वस्थ पडून .
राहायचे. बाळाचे जीवन सुरळीत सुरू होते आहे याकडे डॉक्टर मराठी विज्ञा-लक्ष देतात, बाळ रडले म्हणजे उत्तम. त्याचा आवाज ऐकून माताही खूश! वार पडल्यावर मातेची आणि बाळाची भेट अर्ध्या तासाच्या आत व्हायला हवी. बाळाचे तोंड स्तनाला लागले म्हणजे दूधनिर्मिती सुरू होते, मातेचा रक्तस्रावही कमी प्रमाणात होतो. दोन तासांनी बाळ-बाळंतीण व्यवस्थित आहेत असे पाहून त्यांना त्यांच्या खाटेवर निजवावे.
-डॉ. मन्दाकिनी पुरंदरे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply