कितीही अट्टहास करून मी तिला मिळविला तरी मला काय मिळणार आहे ? एक देह हाडामासाचाच ना ! तिच्या देहात असं काय वेगळं आहे जे इतरांच्या देहात नाही ? मग मला तिच्या ह्या विशिष्ठ देहाचे आकर्षण का वाटते ? तिचा देह तरुण आहे म्हणून का ? तस तरी कसं म्हणता येईल ! तिच्या पेक्षा कित्येक पटीने सुंदर आणि मादक देह असणाऱ्या माझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या कित्येक होत्याच की ! पण तेव्हा मला नाही वाटले ते त्याचे आकर्षण ! हो बरोबर आहे तेव्हा कदाचित ती माझी गरज नव्हती. तेव्हा माझ्या डोळ्यात फक्त स्वप्ने होती. त्या स्वप्नासमोर मला देहाचे आकर्षण कवडीमोल वाटत होते. पण आज माझी सारी स्वप्ने भंगली का ? आज मी एकाकी पडलो का ? की माझ्या देहाला दुसऱ्या देहाच्या आधाराची गरज वाटू लागली आहे. की माझाच माझ्यावरचा विश्वास उडालाय आणि मला सवरायला,आधार द्यायला आणि माझी काळजी घ्यायला कोणी हक्कच असावं म्हणून मी तिच्या देहाच्या प्रेमात पडलो आहे ? मी तिच्या प्रेमात पडलोय असं नाही म्हणता येणार कारण तसं असत तर मला तिच्या व्यतिरिक्त इतर मनमोहक मादक आणि सुंदर देहाचं काही क्षणांसाठी का होईना आकर्षण वाटलंच नसत. इतर देह मला आकर्षित करता आहेत याचा अर्थ मी अजून पुरता तिच्या प्रेमात पडलेलो नाही. ती समोर आली कि माझं लक्ष कोठे जात प्रथम तिच्या चेहऱ्याकडे आणि हळूहळू त्याखालील देहाकडे पण तिचा देह मला आकर्षित वाटत नसावा बहुतेक कारण तिला पाहील्यावर माझे मन बेचैन होते पण शरीर स्थिर असते शरीरात कोणतीच ऊर्जा सळसळत नाही. पण तरीही ती माझी व्हावी ते ही ती आहे तशी तिच्यातील उणिवांसह मी तिला स्वीकारायला का त्यात झालोय ? हे माझेच मला कळत नाही. आश्चर्य हे आहे की पूर्वी ज्या उणिवांसाठी मी कित्येकांना नाकारलं त्या सर्वच्या सर्व उणिवा या एकटीत असतानाही मी तिला आपलं करण्याचा प्रयत्न करतोय ! आज माझी स्वप्ने पूर्ण झाली नाही, जीवनात मी यशस्वी झालो नाही म्हणून हार पत्करून मी हिचा स्विकार करू करू पाहात नाही ना ? पण उद्या मी आतापर्यत केलेल्या कामाचे चीज झाले आणि माझे मेहनतीला फळ मिळाले आणि माझी स्वप्ने माझ्या मुठीत आली तर ? मी नक्कीच तिच्यापासून दूर जाईन. आज मी तडजोड करतोय माझ्या क्षणिक पराभवाला घाबरून ! ती तरी कोठे माझ्या प्रेमात पडलेय ती ही तिच्या आयुष्यासाठी एक आधार शोधतेय नाहीतर माझ्या म्हाताऱ्या देहात तिला तरी का रस वाटावा ? तिलाही फक्त एक देह हवाय जगासाठी तिच्या देहाला साथ देणारा ती साथ किती असावी याची तिला फिकर नसावी तिला फिकर असावी ती फक्त जगाची तोंड बंद करायची आणि जगाच्या डोळ्यातील प्रश्न तात्पुरती का होईना झाकून ठेवण्याची . वरून खालून सारी देह सारखीच त्याच पंच महाभूतांनी बनलेली. देह तरुण काय किव्हा म्हातारे काय दोन्ही नष्ट होतात अनिश्चित समयी ! त्यामुळे एक देह दुसऱ्या देहाला सोबत देतो साथ देत नाही. एक देह दुसऱ्या देहाशी एकरूप कधीच होत नाहीत. काही क्षणांसाठी दोन देह एकत्र येतात पण तेही तिसरा देह जन्माला घळण्यासाठी जन्माला येणार प्रत्येक तिसरा देह स्वतंत्र असतो स्वतंत्र अस्तित्व असणारा असतो हे ते दोन देह कधीच मान्य करीत नाहीत. तो स्वतंत्र असतो म्हणूनच हि दोन देह संपल्यावरही तो आपले अस्तित्व टिकवून असतो. आज मी माझ्या देहाला आधार म्हणून तिच्या देहाकडे पाहतोय पण माझा देह अनेक व्याधींनी त्रासलेला तिचाही तसाच ! त्रासलेले हे दोन देह एकत्र येणार त्यासोबत अनेक प्रश्न समस्या वाद विवाद हेवेदावे घेऊन येणार ते सारे मी का स्वीकारू ? उगाच फक्त तिचा तो रोगी देह मिळविण्यासाठी ! जो कधी नष्ट होईल काही माहीत नाही. तिचं सोडा माझ्या देहाची मला आज तो उद्या पाहिलं कि नाही याची खात्री वाटत नाही. असे असताना मोह तो कसला धरायचा ? ती दुसऱ्या कोणाची तरी होईल ही कल्पना मला सहन होत नाही आणि मला कोणाचे होणे सहन होत नाही हिच्यापूर्वी मला आवडणाऱ्या ज्यांना मी ही आवडायचो अश्या कित्येक दुसऱ्यांच्या झाल्या त्यांची साधी आठवणही मला येत नाही त्यांना मी कधी फेसबुकवरही शोधलं नाही ! मला त्यांनी पाहिले असेल कारण मी लपून राहावा असा नाही ! तसे असतानाही माझा प्रवास समान्यतेतून असमान्यतेकडे सुरु असताना मी एका सामान्य स्त्रीच्या प्रेमात पडणं कितपत योग्य होत तिने आणि मी तिच्यासाठी किती प्रयत्न केला तरी ती चूलआणि मूल या पलीकडे विचार करू शकणार नव्हती आणि मला व्यक्तींश या दोन्ही गोष्टी कामाच्या नव्हत्या माझा फालतू वंश वाढविण्यात मला रस नव्हता आणि खायला मी घरी फार थांबणार नव्हतो ! आता माझ्याकडे फावला वेळ आहे म्हणून मी तिच्या प्रेमात पडलो कदाचित ! प्रेमात पडणं हा माझा स्वभाव असल्यामुळे ही असेल कदाचित ! तिच्या आणि माझ्यात समान असं काहीच नाही मी वर्तमान वाचतो ती चाळते, मी माणसे वाचतो ती माणसात गुंतते, मी भौतिक सुखे लाथाडली ती जमविते, ती जीवन स्वप्नात जगते मी जीवन वास्तवात पाहतो, ती फक्त जगत राहते मी जगण्यालाही मृत्यूत पाहतो, ती माझ्यासोबत सुखी नाही राहू शकत ! कारण ती ही इतरांसारखी डबक्यातील बेडूक आहे . मी डबक्याबाहेरील बेडूक होतो जो तिच्या प्रेमात पडू शकत होतो पण तिच्यासाठी त्या डबक्यात जाऊ शकत नव्हतो कारण तिच्यासाठी मी डबक्यात जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे होते. ती डबक्या बाहेर येऊ शकत होती पण डबक्याबाहेर जगण्याचे सामर्थ्य तिच्यात नव्हते . तिला फक्त एका चौकटीत जगणे माहीत होते आणि मला चौकटी तोडून ! ती माझा आदर करत होती माझ्यावर प्रेमही करत होती पण तिच्याप्रेमासाठी मी बदलणं तिला अपेक्षित होत. तिला माझा वर्तमान माहीत होता माझा भूतकाळ माहीत नव्हता माझा भूतकाळ हे एक अजब विद्यापीठ होते. भूतकाळातील एका एका मोहावर विजय मिळवीत मी वर्तमानात आलो होतो विश्वातील साऱ्या मोहांवर मी विजय मिळविला होता. पण ! या जगात जिवंत राहण्यासाठी एक मोह लागतो माझ्यासाठी तो मोह म्हणजे तिच्या प्रेमात पडणं ! एकाचवेळी मी कित्येकांच्या प्रेमात पडतो. प्रत्येकीत काही ना काही प्रेमात पडण्यासारखे असतेच ! माझे प्रेमात पडणे मला थांबविता येणार नाही ! आणि हे मला तिला सांगता येणार नाही ! तिच्यात आणि माझ्यात प्रेमापलीकडे एक नाते असते तेच असावे कारण ती मला आवडत होती पण तिच्या भौतिक देहाचे मला आकर्षण नव्हते, ती मला माझ्या सोबत हवी होती पण तिने काहीच करणे मला अपेक्षित नव्हते. ती माझी नाही झाली तरी ती सुखी राहावी सर्वार्थाने हेच मला हवे होते . ती डबक्यात राहूनही सुखी राहणार होती आणि मी मोकळ्या आकाशाखाली दुःखी ! तीच डबकं हळू हळू एकतर कोरड होईल नाहीतर मोठं ! कोरड झालं तर मी तिला साथ देईन आणि वाढत गेलं तर मी तिच्यापासून दूर जाईन. आता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे ? डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ? ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ! जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय! ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल …
लेखक – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, जलधारा एस. आर. ए. गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
मो. ८१६९२८२०५८ / ८६९२९२३३१०
Email – nileshbamne10@gmail.com
Leave a Reply