स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे .
तीला ही मन आहे ,ह्रदय आहे.
तीला ही भावना आहेत .
ती ला ही हसावेसे वाटते .
चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते .
आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते .
काम करून ती ही थकते .
ती ला ही आरामाची गरज असते .
असे म्हणतात की या जगात कोणीही परिपुर्ण नाही ,मग एका स्त्री कडून ती परिपुर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते .
प्रत्येक वेळी तीच्या चुकांचा उहापोह का केला जातो ?
का वारंवार केलेल्या चुकांच्या उहापोहामुळे तीच्यात न्युनगंड तर निर्माण होत नाही ना?
कधी आळशी तर अकार्यक्षमतेची लेबल्स चढविली जातात .
केवळ पोटाला जेवण ,अंगाला कपडा व चैनीला वस्तु एवढ्याच तीच्या गरजा असतात का?
नाही , खरी गरज असते ती भावनिक आधाराची ,तीला समजुन घेणार्या आपल्या माणसाची ,तीला गरज असते प्रेमाची ,मायेची .
तुमचा एक कौतुकाचा शब्द तीला दहा हत्तींचे बळ देऊन जाते .
“तु थकली असशील ,थोडा आराम कर “हे प्रेमळ शब्द तीला नवीन उत्साह देऊन जातात .
तीला ही तीच्या आवडी निवडी असतात .
तीला ही मित्र मैत्रिणी असताच ,त्याच्यात बसावं गप्पा गोष्टी कराव्यात असही तीला वाटते .
कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची तीचीही इच्छा असते
तीलाही कधी कधी एकांतात बसावेसे वाटते .
भुतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो .
तीच्या आवडत्या व्यक्तीशी खुप गप्पा माराव्याशा वाटतात .
पण म्हणुन काय ती स्वैराचारी होते ?का ती माणुस नाही ?
तीला भावभावना नाहीत ?
का तीच्या गरजा इतरांपैक्षा वेगळ्या असतात ?
मित्रांनो !
तीला समजुन घ्या ,तीचे दुःख समजुन घ्या .
तीच्याशी मनमोकळे पणाने बोला ,कारण हे आयुष्य खुप लहान आहे .
व गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही .आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी व डोळ्यात पश्चातापाचे पाणी !!!!
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
Leave a Reply