मी ‘स्त्री’ या विषयाकडे गमतीने परंतू गंभीरपणे बघतो..अनेक वर्षांच्या निरिक्षणातून, वाचनातून ‘स्त्री’विषयी माझं असं एक मत बनलंय.. जगातील कोणत्याही समाजात ‘स्त्री’ जन्मत नाही तर ती ‘घडवली’ जाते.. जन्म घेताना ती कोणत्याही जीवाप्रमाणे सर्वसामान्य जीवाप्रमाणेच असते मात्र तीने एकदा का जन्म घेतला, की मग त्या क्षणापासून तीला ‘स्त्री’ म्हणून घडवण्यासाठी तिच्यावर हातोडा-छिन्नीचे घाव बसायला सुरूवात होते..घर आणि समाज हे काम अतिशय आत्मियतेने करत असतात..परत या घावांना ‘संस्कार’ असं गोंडस नांवही दिलं जातं..हातोडा-छिन्नीने घडवलेल्या त्या ‘स्त्री’ची मुर्ती (मुर्तीच नाहीतर काय? मुर्तीला कुठे भाव-भावना, आचार-विचार-विकार असतात?) देव्हाऱ्यात बसवली जाते..आणि मग एकदा का ती देवी झाली ती मग समाज देईल तोच नैवेद्य आणि समाज म्हणेल तीच जत्रा..
असं होण्यात जगभरात उन्नीस-बीस होतं असेल परंतू त्याच जगातील कोणताही समाज याला अपवाद नाही..इथे ती अंबा होते तर कुठे ती मेरी..!
– नितीन साळुंखे
9321811091
(या स्फुटातली मतं माझ्या अनेक वर्षांच्या विचारातून /वाचनातून तयार झाली आहेत. आपण त्यांच्याशी सहमत होणं आवश्यक नाही.)
Leave a Reply