नवीन लेखन...

‘स्ट्रीट माईम’च्या प्रचारासाठी..

जनजागृतीसाठी पथनाटय़ाचा वापर करतात हे साऱ्यांनाच माहीत आहे, मात्र परदेशात प्रसिद्ध असलेला स्ट्रीट माईम हा कलाप्रकार भारतात फार कमी प्रसिद्ध आहे. माईमचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेच्या तरुणांनी पाऊल उचललं आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला या तरुणांनी सीएसटी, मरिनड्राईव्ह आणि कुलाबा अशा ठिकाणी स्ट्रीट माईम सादर केलं. त्यांच्या कलेविषयी थोडसं.

lead1एकांकिका, नाटक अशा कलेतून पुढे आलेले अनेक कलाकार आपल्याला माहीत आहेत. अशाच प्रकारातला एक कलाप्रकार म्हणजे ‘माईम.’ शब्दांचा वापर न करता, चेह-याचा हावभाव करत एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे माईम. युरोप, अमेरिका, सिक्कीम अशा ठिकाणी हा माईम प्रकार प्रचंड चालतो. स्ट्रीट माईमलाही परदेशात प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे पटनाथ्य सादर करून जनजागृती केली जाते. भारतातही स्ट्रीट माईमचा प्रकार रुजावा याकरता काही तरुण प्रयत्न करत आहेत.

नववर्षाच्या पूर्व संध्येला सीएसटी, मरिन ड्राईव्ह, कुलाबा अशा ठिकाणी काही तरुण स्ट्रीट माईम करताना दिसले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या तरुणांनी स्ट्रीट माईमचं आयोजन केलं होतं. स्वप्नील गटवे, प्रमोद गुतूकडे, कुणाल काटे, सुयोग आंब्रे, प्रणय फडतरे, सागर चव्हाण आणि दीप नाईक या तरुणांनी कुणाल मोतलिंग याच्या मार्गदर्शनाखाली या स्ट्रीट माईमला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कॉमेडी अॅक्ट सादर केल्यावर मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी ‘सलाम मुंबई पोलीस’ यावर आधारित कलाकृती सादर केली.

माईम आर्ट अॅण्ड कल्चरलचा संचालक कुणाल मोतलिंग म्हणतो की, ‘परदेशात स्ट्रीट माईमला प्रचंड मागणी आहे. मात्र आपल्या देशात स्ट्रीट माईमचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. आपल्या हावभावने लोकांपर्यंत एखादा विषय नेणं फार अवघड काम असतं, जे माईममध्ये होतं. भारतातही माईम संस्कृती रुजावी, याकरता आम्ही स्ट्रीट माईम अॅक्टचा उपयोग करायचं ठरवलं.’

एकांकिका, नाटक अशा कलेशी खरा संबंध जडतो तो महाविद्यालयातून. आज प्रत्येक महाविद्यालयात स्वंतत्र सांस्कृतिक विभाग आहे. कला क्षेत्रात पदार्पण करू पाहणा-या विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक विभागाचा खूप फायदा होतो. मात्र आजही अनेक कॉलेजमध्ये माईम या क्षेत्राला हवा तेवढा वाव मिळालेला नाही. शिवाय माईमच्या स्पर्धाही खूप कमी प्रमाणात भरवल्या जातात. त्यामुळे माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतील तरुण मंडळी माईमचा प्रचार करण्यासाठी पुढे आली आहेत.

२२ मार्च रोजी जागतिक माईम दिवस साजरा केला जातो. माईम या कलाप्रकाराचा प्रचार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इच्छुक कलाकारांनी सहभागी होऊन त्यांची माईम कला सादर करायची आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी २२ सप्टेंबर रोजीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या दोन्ही कार्यक्रमांना अनेक इच्छुक कलाकार सहभागी होत असतात. अशाच कार्यक्रमांमुळे माईमला कलाप्रकाराला चालना मिळेल, असं या संस्थेतील तरुणांना वाटतं.

माईम आर्टिस्ट असलेला कुणाल मोतलिंग सांगतो, एका शाळेत माईम आर्ट शिकवतो. शिवाय अनेक माईम स्पर्धामध्ये परीक्षकांचं कामही करतो. इतरांना शिकवता शिकवता त्यालाही खूप शिकायला मिळतं असं तो सांगतो. माईम आणि स्ट्रीट माईम कलाप्रकाराचा भारतभर प्रचार व्हावा यासाठी या तरुणांनी उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पदच म्हणावं लागेल.

स्नेहा कोलते 
Sneha Kolte
snehagkolte.sk@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..