नवीन लेखन...

स्त्रियांवरील वाढते अत्याचार – एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव !

भारतीय समाज हा विविधतेने नटलेला, हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला, परंपरा, संस्कृती, आणि मूल्यांनी संपन्न असा समाज असला तरी या समाजात असंख्य सामजिक समस्या दिसून येतात .त्यात स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव आहे. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक विकासाच्या खूप पुढे जाऊनही, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. उलट, त्यांची संख्या वाढत चालली आहे, आणि त्यामुळे भारतीय समाजातील मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये बलात्कार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा, अपहरण अशा घटनांची नोंद होत असते. या घटनांचा वाढता आलेख आपल्या समाजाच्या एकंदरीत मानसिकतेचे आणि सांस्कृतिक अध:पतनाचे द्योतक आहे. असे का होत आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

स्त्रियांवरील अत्याचार अनेक प्रकारांनी होतो. लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, ऑनलाइन छळ, शारीरिक आणि मानसिक छळ असे अत्याचाराचे विविध प्रकार आहेत. काही ठिकाणी आजही दहावी नंतर मुलीचे लग्न लावून देण्याची घृणास्पद मानसिकता समाजात दिसून येते. तसेच,मुलींना कमी लेखण्याची प्रवृत्ती आणि स्त्री म्हणजे घरातील कामकाजासाठी असल्याची धारणा अद्यापही समाजात प्रकर्षाने पाहायला मिळते.मूलतः स्त्रियांवरील अत्याचारांची मुळे ही भारतीय समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजलेली आहेत.

स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेची मानसिकता व महिला लिंगभेदाच्या संकुचित मानसिकतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. शिक्षण आणि जागरूकतेच्या अभावामुळे आणि महिलांच्या हक्कांविषयी अधिकरांविषयी असलेल्या अपुऱ्या माहिती मुळे अत्याचार वाढत आहेत. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणे कठीण जाते. तसेच समाजातील रुढी आणि परंपरांचे वर्चस्व. काही ठिकाणी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे सांस्कृतिक मान्यतेतून साकारले जातात. उदाहरणार्थ, काही ठिकाणी आजही हुंडा प्रथा अद्यापही आअस्तित्वात असल्याचे दिसून येते, ज्यामुळे महिलांना त्यागाचे बळी ठरावे लागते. याशिवाय, ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणावर कमी भर देण्याची प्रवृत्ती, आर्थिक दुर्बलता, आणि सामाजिक विषमता या सगळ्यांनी मिळून स्त्रियांवरील अत्याचाराची शक्यता वाढली आहे.

भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. स्त्रीचा सन्मान आणि संरक्षण हे केवळ तिचेच नाही, तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीने या कर्तव्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळेच एक सशक्त, समान, आणि प्रगल्भ समाजाची निर्मिती होईल.

– अमोल अनिता अशोक तांबे.

Avatar
About अमोल अशोक तांबे 2 Articles
खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत. कविता, लेखन, वाचन यांचा छंद. नाटक, एकांकिका मध्ये काम करतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..