नवीन लेखन...

जेष्ठ गायीका मा.सुधा मल्होत्रा

जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली.

तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड – किशोर कुमार यांच्या बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), व मराठीत तर त्यांनी अमराठी असुन ठसा उमटवला. शुक्रतारा मंद वारा (मा.अरुण दाते यांच्या बरोबर) आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर ती गाणी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.

विसरशील खास मला” हे मालकंस रागातील नितांत सुंदर गीत. त्यावेळेस यशवंत देव आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीला होते. दोन कार्यक्रमांमधील जागा भरून काढण्यासाठी त्यांना एक गाणे हवे होते. “विसरशील खास मला” हे गीत त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याकडून म्हणून घेतले. हे गीत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले. त्यावेळेस कामात खूप व्यस्थ असलेल्या आशा भोसले यांना हे गीत खूप भावले.

त्यानंतर काही वर्षांनी आशा भोसले यांच्या विनंतीवरून यशवंत देव यांनी हे गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. शुक्रतारा मंदवारा हे गाणे जवळ जवळ १०० चे वर मा.सुधा मल्होत्रा शुक्रतारा मंदवारा या कार्यक्रमाच्या निमिताने मा.अरुण दाते यांच्या बरोबर गायल्या.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..