सुधांशू येता गगनी,
चांदण्या चमचम करती,
धरेवरती रात्र काळी,
रानकेवडे घमघम करती,
आकाशी पखवाज वाजती,
एकत्र येऊन ढग खेळती,
रात किड्यांची “धांदल” होई,
वाट काढण्या पृथ्वीवरती,
“ओलेतेपण” या झाडांवरी,
काळ्याशार सावल्या पडती,
असंख्य काजवे वाट दाखवती, निसर्गाची धरेवर दीपावली,
किर्र किर्र””_ आवाज करती,
रात किडे लगबग”” करती,
वरती चांदण्या येती जाती,
कुणास ठाऊक कुठे भ्रमंती,
वाट पाहत दिवसाची,
आभाळ उगा डोलत राही,
रात किड्यांची चमचम संपली, समय कसा पुढे जात राही,
झाडे झुकती वाऱ्यावरती,
वृक्षलता त्यांच्यात मिसळती,
कळ्या फुले पानोपानी दडती,
अंधाराची त्या वाटून भीती, पहाटे दवबिंदूओघळती,
गार हवेत विहरत येती, प्रकाश–गाणीगुणगुणती,
पडून तृणावर मजा करती,
जल थेंबांची जादू सगळी,
पाहण्या चांदण्या डोकावती,
यावया उत्कंठेने पृथ्वीवरती,
हळूच एक एक पळ” काढती,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply