मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरस्त्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म १९४८ रोजी मुंबईत झाला. सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून अर्थशास्त्रात बी.ए. केले होते. अभिनया कडे वळण्या आधी ते मुंबईतल्या ब्लॅकी ॲड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते.
कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. सुधीर जोशी यांनी मराठी सिनेसृष्टीत एक काळ गाजवला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.
सुधीर जोशी यांच्या निधनानंतर ते करत असलेल्या “मातीच्या चुली’ या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती. सुधीर जोशी यांचे १४ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply