सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे…१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती…२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करीते….३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी….४
लगेच अनुभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा…५,
पुनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख….६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी…७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक…८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply