सुखाचा छंद,न लागो जीवाला
आहे तो निवारा, अपुला बरा
मोहविते कायम, सुखाची जरतार
वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा
सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे
एकचि रंग सावळा, अपुला बरा
दुखावते मन, यातना कठीण
गोंजारु तयाला, लाडाने जरा
सुख हे क्षणिक, मृगजळ जाण
शोधावा निवारा, समाधानी खरा
तुझे माझे काही, कमी नि अधिक
आहे त्यात सुख, मानावे जरा!
— वर्षा कदम.
Leave a Reply