सरता दिवस, राहते उभी सामोरी सांज
जशी प्रसन्न प्राची, तशीच सांजही सुंदर
अंतरात भावनांची लोभस ती सोनसळी
जीवा सुखावणारी सांजाळ क्षितिजावर
सुखाचाच संसार, नाही कुणाशीही वैर
तृप्तले, सारे जीवन केले प्रेम सर्वावर
आता आठविती क्षण सारेच हरवलेले
होता आत्ममुख मन होई कातर कातर
आता न अंतरी सुखदुःखाचे मोजमापदंड
सारेच आपुले, हाच भाव जागो निरंतर
जगताजगता राखावित बहुतांची अंतरंगे
स्मरावी गीता, आणि रूप ते शामसुंदर
***********
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.३११
२८/११/२०२२
Leave a Reply